शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दिल्लीसह देशातील सर्व CRPF शाळांमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी, पोलिसांनी सुरक्षा वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 14:09 IST

CRPF Schools : सोमवारी रात्री देशातील अनेक शाळांना हा मेल आला होता. 

नवी दिल्ली : सीआरपीएफच्या (CRPF) दिल्लीसह देशभरातील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील सर्व सीआरपीएफ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल आला आहे. सोमवारी रात्री देशातील अनेक शाळांना हा मेल आला होता. 

दरम्यान, तपासणीनंतर शाळांमध्ये काहीही आढळून आले नाही. मेल पाठवणाऱ्याने सकाळी ११ वाजेपर्यंत सीआरपीएफच्या सर्व शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. मेल पाठवणाऱ्याने डीएमकेचे माजी नेते जफर सादिक यांच्या अटकेचा उल्लेख केला होता. जफर सादिक यांना एनसीबी आणि नंतर ईडीने अटक केली होती.

दिल्लीतील ज्या दोन सीआरपीएफ शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या, त्यापैकी एक रोहिणी आणि दुसरी द्वारका येथील आहे. या मेलचा रोहिणी येथील प्रशांत विहारमध्ये झालेल्या स्फोटाशी कोणताही संबंध नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा या शाळांच्या व्यवस्थापनाला पाठवलेल्या ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली. तपासादरम्यान बॉम्बस्फोटाची माहिती अफवा असल्याचे निष्पन्न झाले.

दिल्लीत सुरक्षा वाढवलीया धमकीनंतर सीआरपीएफने आपल्या सर्व शाळांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. दिल्ली पोलिसांनी सीआरपीएफ शाळांबाहेरही सुरक्षा वाढवली आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

यापूर्वीही अशा प्रकारची धमकी४ ऑक्टोबर रोजी बंगळुरूमधील तीन इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती. यामुळे कॅम्पसमध्ये घबराट पसरली होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि बसवानगुडी येथील बीएमएस कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग आणि सदाशिवनगरमधील एमएस रमैया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांना दुपारी एकच्या सुमारास ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती. मात्र, शोध घेतल्यानंतर ही धमकीची अफवा असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिसSchoolशाळाBombsस्फोटके