शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा मुलायमसिंह भर लोकसभेत म्हणतात, मोदींनीच पुन्हा पंतप्रधान व्हावं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 18:56 IST

समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते आणि आझमगडचे खासदार मुलायम सिंह यादव यांनी मोठं विधान केलं आहे.

नवी दिल्ली- समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते आणि आझमगडचे खासदार मुलायम सिंह यादव यांनी मोठं विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे, यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. विशेष म्हणजे भाजपा विरोधात महागठबंधन तयार होत असताना मुलायम सिंह यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पुढे मुलायम सिंह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मी त्यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा देतो. लोकसभेतील सर्व सदस्य पुन्हा निवडून येऊ देत आणि तुम्ही परत पंतप्रधान व्हा, असंही मुलायम सिंह यादव लोकसभेत मोदींना उद्देशून सांगितलं आहे. मुलायम सिंह यांच्या या विधानानंतर लोकसभेच्या पुढच्या बाकावर बसलेल्या सोनिया गांधींनाही हसू आलं.समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. मोदी नेहमीच चांगलं काम करत आले आहेत. त्यांनी नेहमीच माझी मदत केली आहे. मोदींचं कौतुक केल्यानंतर समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यादव यांनी मोदींना हात झोडून अभिवादनही केलं. तत्पूर्वी समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी लखनऊमध्ये कार्यकर्त्यांवर केलेल्या बळाच्या प्रयोगावर टीका केली होती. त्यावेळी केंद्र सरकारनं सांगितलं होतं की, भाजपा आणि केंद्राचा याच्याशी काही देणंघेणं नाही.लोकसभेत समाजवादी पार्टीचे खासदार धर्मेंद्र यादव यांनी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे प्रयागराजमध्ये करण्यात आलेल्या लाठीचार्जसंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात  विशेषाधिकारात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला असून, तो स्वीकार करण्याची मागणी सुमित्रा महाजनांकडे केली आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा