शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

मुकूल रॉय यांची घर वापसी; ममता म्हणाल्या- आपल्या लोकांचं स्वागत, विश्वासघात करणाऱ्यांना स्थान नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 18:20 IST

भजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय यांनी शुक्रवारी पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रेवेश केला. मुकूल रॉय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसच्या मुख्यालयात जाऊन पक्षाचे सदस्यत्व घेतले.

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या तृणमूल काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे. आज भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय (Mukul roy) यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये घर वापसी केली. मुकूल रॉय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ममता म्हणाल्या मुकूल आपल्या घरचेच सदस्य आहेत. ते आपल्या घरी परतले आहेत. त्यांचे अभिनंदन करते. (Mukul roy joining tmc in presence of west bengal cm mamata banerjee in kolkata)

भजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय यांनी शुक्रवारी पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रेवेश केला. मुकूल रॉय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसच्या मुख्यालयात जाऊन पक्षाचे सदस्यत्व घेतले. यावेळी ममता म्हणाल्या, मुकूल आपल्याच घरातील सदस्य आहेत. ते आपल्या घरी परत आले. मी त्यांचे अभिनंदन करते. निवडणुकीदरम्यान मुकूल यांनी आपल्यासोबत विश्वासघात केली नाही. ज्या लोकांनी विश्वासघात केली, त्यांना आम्ही पक्षात घेणार नाही. याच वेळी मुकूल रॉय यांना महत्वाची भूमिका दिली जाईल, असेही ममता म्हणाल्या.

तृणमूल काँग्रेसच्या मुख्यालय आयोजित पत्रकार परिषदेत मुकुल रॉय म्हणाले, 'टीएमसीत परतल्याने मला फार बरे वाटत आहे. भाजपतून बाहेर पडल्याने आणि आपल्या लोकांना भेटून फार चांगले वात आहे. मी भाजपत काम करू शकलो नाही. यामुळे आपल्या  जुन्या घरी परत आलो. रॉय म्हणाले, मी भाजप सोडून TMC त आलो आहे, आता बंगालमध्ये जी स्थिती आहे, त्या स्थितीत भाजपत कुणीही राहणार नाही. मुकूल यांच्या मुलानेही भाजपत प्रवेश केला आहे. मुकुल रॉय हे सर्वात पहिले टीएमसी सोडणाऱ्या नेत्यांपैकी एक होते ते 2017 मध्ये भाजपत गेले होते.

पराभूत झाल्याने पश्चिम बंगाल भाजपमध्ये संघर्ष -विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने पश्चिम बंगाल भाजपमध्ये संघर्ष सुरू आहे. बंगाल भाजपच्या एक उपाध्यक्षाचे म्हणणे आहे, की हीच परिस्थिती राहिली, तर त्यांना सर्वांनाच घरी बसावे लागेल. भाजपच्या एका महिला आमदाराचे म्हणणे आहे, की पराभवानंतर स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. आमचे स्थानिक पातळीवरील कार्यकर्तेच आम्हाला सोडून जात आहेत. भाजपतील जुने लोकही सुवेंदू अधिकारी आणि तृणमूलमधून आलेल्या लोकांमुळे नाराज आहेत. पुढे काय होईल कुणास ठाऊक? अशातच मुकूल रॉय पक्ष सोडून गेल्याने पश्चिम बंगाल भाजपमध्ये सर्व काही ठीक नाही, हे स्पष्ट झाले आहे.

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा