सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवरही मोठा ताण पडत आहेत. ऑक्सिजन, औषधांचीही सध्या मोठ्या प्रमाणात भासत आहे. सरकारव्यतिरिक्त इतर संस्था ऑक्सिजनचे उत्पादन आणि वितरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं दररोज सुमारे एक हजार टन मेडिकल ऑक्सिजनचं उत्पादन सुरू केलं आहे.कंपनीने वैद्यकीय ऑक्सिजनचं उत्पादन ० ते १ हजार टनपर्यंत वाढवलं आहे. जे देशातील वैद्यकीय ऑक्सिजनच्या उत्पादनाच्या ११ टक्के आहे, असं कंपनीनं आपल्या निवेदनाद्वारे सांगितलं आहे. तसंच मुकेश अंबानी स्वत: गुजरातच्या जामनगरमधील कंपनीच्या उत्पादन आणि पुरवठ्यावर लक्ष ठेवून असल्याची माहितीही कंपनीकडून देण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचविणं हे माझ्यासाठी आणि संपूर्ण रिलायन्स इंडस्ट्रीजचं पहिलं प्राधान्य आहे, असं मुकेश अंबानी म्हणाले. "भारताला सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसत आहे. अशा परिस्थितीत मेडिकल ऑक्सिजनचं उत्पादन वाढवून उत्तम पुरवठा व्यवस्था स्थापन करायला हवी," असंही त्यांनी नमूद केलं. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात कंपनीनं १५ हजार टन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. याशिवाय कंपनीनं सौदी अरेबिया. जर्मनी, बेल्जिअम, नेदरलँड्स आणि थायलंडमधून ५०० टन ऑक्सिजन कंटेनरदेखील एअरलिफ्ट केले आहेत. त्यामुळे पुरवठ्यातही वाढ झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Reliance कडून दररोज १ हजार टन ऑक्सिजनचं उत्पादन; मुकेश अंबानीही स्वत: लक्ष ठेवून
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 16:42 IST
Coronavirus Oxygen crisis : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजनही मोफत ऑक्सिजन पुरवण्यास घेतलाय पुढाकार
Reliance कडून दररोज १ हजार टन ऑक्सिजनचं उत्पादन; मुकेश अंबानीही स्वत: लक्ष ठेवून
ठळक मुद्देमुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजनही मोफत ऑक्सिजन पुरवण्यास घेतलाय पुढाकारमुकेश अंबानी स्वत: या पुरवठ्यावर लक्ष ठेवून असल्याची कंपनीची माहिती