शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
3
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
4
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
5
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
6
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
7
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
8
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
9
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
10
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
11
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
12
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
13
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
14
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
15
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
17
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
18
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
20
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   

'मुघलांनी कधीच धर्माच्या नावावर अत्याचार आणि धर्मांतर केले नाही'; काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 18:06 IST

'मुघलांनी हा भारत देश बनवला, आम्ही(काँग्रेस) अकबराला आपलाच मानतोत.'

नवी दिल्ली:काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर(Mani Shankar Aiyar) पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. मणिशंकर अय्यर यांनी मुघल आणि मुस्लिमांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 'मुघलांनी धर्माच्या नावाखाली कधीही अत्याचार केला नाही. आम्ही(काँग्रेस) अकबराला आपलाच मानतो,' असं अय्यर म्हणाले. याशिवाय, त्यांनी भाजपवर टीका करताना जिन्नाचंही कौतुक केलं.

मुघलांच्या काळात जबरदस्तीने धर्मांतर झालं नाहीमणिशंकर अय्यर यांनी जुन्या जनगणनेचा दाखला देत म्हटले की, 1872 मध्ये देशात 72 टक्के हिंदू आणि 24 टक्के मुस्लिम होते. कमी-अधिक प्रमाणात ही संख्या अजूनही तेवढीच आहे, त्यामुळे मुस्लिमांवर लोकसंख्या वाढल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. मणिशंकर अय्यर यांनी यावेळी मुघल राजवटीचंही कौतुक केलं. नेहरू जयंतीनिमित्त एका कार्यक्रमादरम्यान मणिशंकर अय्यर यांनी मुघल राजवटीत झालेल्या अत्याचाराच्या चर्चेचं खंडन केलं. मुघल सम्राट अकबरापासून ते इतर सर्व मुघल सम्राटांपर्यंत, मुघल राजवटीत कोणतेही जबरदस्तीने धर्मांतर झालं नसल्याचा दावा त्यांनी केला. 

भारताला आपला मानायचे मुघलमुघल राजवटीची स्तुती करताना अय्यर म्हणाले की, ब्रिटीश आणि मुघल यांच्यातील मोठा फरक म्हणजे मुघल या देशाला आपला मानत होते. अय्यर यांनी बाबरचे कौतुक करताना म्हटले की, बाबरने आपला मुलगा हुमायूनला एक पत्र लिहिले होते, ज्यामध्ये त्याने भारतातील लोकांच्या धर्मात हस्तक्षेप न करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळेच अकबराच्या काळात धर्माच्या नावावर कधीच भेदभाव झाला नव्हता. मुघलांनी हा देश स्वतःचा बनवला. बाबर 1526 मध्ये भारतात आला आणि तो 1530 मध्ये मरण पावला. म्हणजे तो भारतात फक्त 4 वर्षे राहिला. त्याने हुमायुनला सांगितले की, जर हा देश चालवायचा असेल, जर इथल्या रहिवाशांच्या धर्मात ढवळाढवळ करू नको, असंही अय्यर म्हणाले.

भाजपच्या मते केवळ 80 टक्के भारतीय आहेतअय्यर यांनी यावेळी भाजपवरही जोरदार हल्ला चढवला. सत्तेत असलेल्यांनाच देशातील 80 टक्के जनतेची चिंता आहे, असा आरोप त्यांनी केला. सत्तेत असलेल्यांसाठी फक्त 80% लोक खरे भारतीय आहेत, बाकीचे पाहुणे म्हणून जगत आहेत. मुस्लिमांच्या लोकसंख्येबाबत त्यांनी केलेल्या विधानाच्या समर्थनार्थ युक्तिवाद मांडताना त्यांनी वस्तुस्थितीही मांडली. जुन्या जनगणनेचा दाखला देत मणिशंकर अय्यर म्हणाले की, 1872 मध्ये ब्रिटिशांनी पहिली जनगणना केली तेव्हापासून आतापर्यंत भारतात कमी-अधिक प्रमाणात मुस्लिमांची संख्या 24 टक्के आणि हिंदू 72 टक्के असल्याचे दिसून आलं आहे.

जिन्नांची स्तुती, भाजपवर टीकाते पुढे म्हणाले की, भाजपवाले म्हणतात की, त्या काळात हिंदू मुलींवर बलात्कार झाले आणि सगळ्यांना मुस्लिम केले. पण, तुम्ही मुस्लिम झाला असता तर आज आकडेवारी वेगळी असायला हवी होती. आज देशात 72 टक्के मुस्लिम असायला हवे होते आणि 24 टक्के हिंदू असायला हवे होते. फाळणीची मागणी करण्यापूर्वी जिन्नाची एकच मागणी होती की, सेंट्रल असेंब्लीमध्ये 30 टक्के आरक्षण द्यावे. त्यांनी कधीच 80 किंवा 90 टक्के मागितले नाही. त्यांनी 30 टक्के मागितले आणि तेही नाकारले गेले, असंही ते म्हणाले.  

टॅग्स :congressकाँग्रेसMani Shankar Aiyarमणिशंकर अय्यर