मुफ्ती व अब्दुल्ला घराण्यांना उखडून फेका - अमित शाहनी फोडला काश्मिर-प्रचाराचा नारळ
By Admin | Updated: August 25, 2014 14:42 IST2014-08-25T14:42:51+5:302014-08-25T14:42:51+5:30
जम्मू व काश्मिरचा विकास व्हायला हवा असेल तर मुफ्ती व अब्दुल्ला या दोन्ही परीवारांना उखडून फेकून टाका असे आवाहन करत भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी जम्मू व काश्मिरमध्ये प्रचाराचा नारळ फोडला.

मुफ्ती व अब्दुल्ला घराण्यांना उखडून फेका - अमित शाहनी फोडला काश्मिर-प्रचाराचा नारळ
>ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. २५ - जम्मू व काश्मिरचा विकास व्हायला हवा असेल तर मुफ्ती व अब्दुल्ला या दोन्ही परीवारांना उखडून फेकून टाका असे आवाहन करत भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी जम्मू व काश्मिरमध्ये प्रचाराचा नारळ फोडला. जम्मू व काश्मिरमध्ये विधानसभेच्या ८८ जागा असून मिशन ४४ हे भाजपाचे लक्ष्य असल्याचे ते म्हणाले. जम्मूला सावत्र मुलासारखं वागवण्यात आल्याचं ठासून सांगत या राज्यात आलेला सगळा पैसा मुफ्ती व अब्दुल्ला या घराण्यांनी हडप केल्याचं शाह म्हणाले.
गेल्या साठ वर्षांमध्ये काश्मिरमधून निर्वासित झालेल्या लाखो विस्थापितांचं पुनर्वसन जम्मू व काश्मिरमध्ये भाजपाचं सरकार आल्यास करू असं आश्वासन शाह यांनी दिलं. गेल्या तीन महिन्यांमध्ये पंतप्रधान मोदींनी तीन प्रकल्पांचं लोकार्पण केल्याचं सांगताना अमरनाथ यात्रेदरम्यान भंडा-यांना लावलेल्या आगीचा उल्लेख करत जर धार्मिक संरक्षण हे सरकार देत नसेल तर त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याचे शाह म्हणाले.
नरेंद्र मोदींचा निरोप घेऊन आपण आलो असल्याचं सांगताना काँग्रेसमुक्त भारत हे आपलं उद्दिष्ट असल्याचं सांगताना काश्मिरपण काँग्रेसमुक्त करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. भारताच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात जम्मू व काश्मिरला यायचं असेल तर भाजपाला निवडून आणा असं त्यांनी सांगितले.