न्या.बालाकृष्णन यांची एका न्यायाधीशावर मेहेरनजर
By Admin | Updated: August 12, 2014 02:06 IST2014-08-12T02:06:51+5:302014-08-12T02:06:51+5:30
तत्कालीन सरन्यायाधीश के.जी. बालाकृष्णन यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या एका बदनाम न्यायाधीशाला सर्वोच्च न्यायालयात बढती दिल्याचा आरोप

न्या.बालाकृष्णन यांची एका न्यायाधीशावर मेहेरनजर
नवी दिल्ली : तत्कालीन सरन्यायाधीश के.जी. बालाकृष्णन यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या एका बदनाम न्यायाधीशाला सर्वोच्च न्यायालयात बढती दिल्याचा आरोप करीत प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाचे अध्यक्ष न्या. मार्कंडेय काटजू यांनी नवा बॉम्बगोळा टाकला आहे.
न्या. बालाकृष्णन यांच्या नेतृत्वातील निवडकर्त्या कोलोजियममध्ये एस.एच. कपाडिया हेही होते. त्या न्यायाधीशाला सर्वोच्च न्यायालयात आणण्यात त्यांनी जवळजवळ यश मिळविले होते. मात्र तामिळनाडूतील वकिलांनी सदर न्यायाधीशाच्या भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करीत हा प्रयत्न हाणून पाडला, असे न्या. काटजूृ यांनी म्हटले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष असलेले बालाकृष्णन यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही. संपुआ सरकारच्या काळात तामिळनाडूच्या एका न्यायाधीशाला कायम ठेवताना बालाकृष्णन आणि अन्य दोन माजी सरन्यायाधीशांनी अयोग्यरीत्या तडजोड केल्याचा आरोप न्या. काटजू यांनी याआधी केला होता. काटजू यांनी न्या. कपाडिया यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ब्लॉगवर नवा आरोप केला आहे. मी कोणत्याही अपात्र न्यायाधीशाला सर्वोच्च न्यायालयात आणले नाही, असे कपाडिया यांनी रविवारी ब्लॉगवर म्हटले होते.
(लोकमत न्यूज नेटवर्क)