Viral Video : पतीला जिममध्ये गर्लफ्रेन्डसोबत पकडलं रंगेहाथ, पत्नीने तिथेच केली दोघांचीही धुलाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 12:39 PM2021-10-18T12:39:55+5:302021-10-18T12:40:22+5:30

Madhya Pradesh Crime News : पत्नीने पतीला एका दुसऱ्या महिलेसोबत जिममध्ये वर्कआउट करताना रंगेहाथ पकडलं. ज्यानंतर पत्नीने दोघांना सर्वांसमोर धुलाई दिली.

MP : Wife beat up husband and his girlfriend in gym, video viral | Viral Video : पतीला जिममध्ये गर्लफ्रेन्डसोबत पकडलं रंगेहाथ, पत्नीने तिथेच केली दोघांचीही धुलाई

Viral Video : पतीला जिममध्ये गर्लफ्रेन्डसोबत पकडलं रंगेहाथ, पत्नीने तिथेच केली दोघांचीही धुलाई

Next

Madhya Pradesh Crime News  : मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमधून (Bhopal) एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एक महिला एका पुरूषाला आणि एका दुसऱ्या महिलेला मारताना (Extra marrital affair) दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेने तिच्या पतीला आणि त्याच्या गर्लफ्रेन्डला मारहाण केली. पत्नीने पतीला एका दुसऱ्या महिलेसोबत जिममध्ये वर्कआउट करताना रंगेहाथ (Wife caught husband cheating) पकडलं. ज्यानंतर पत्नीने दोघांना सर्वांसमोर धुलाई दिली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये बघू शकता की, आधी महिलेने पतीच्या गर्लफ्रेन्डचा चपलेने मारहाण केली. नंतर तिचे केस पकडून तिला मारलं. यादरम्यान तिचा पती तिला रोखत होता आणि गर्लफ्रेन्डला वाचवत होता. त्यामुळे पत्नीने पतीलाही चपलेने बडवलं. त्यानंतर हे इतक्यावरच थांबलं नाही तर दोन महिलांमध्येही फाइट झाली. एका जिममध्ये बराचवेळ हा तमाशा सुरू होता. त्यावेळी लोकही हे सगळं बघत होते.

मीडिया रिपोर्टनुसार, पती-पत्नीची कोर्टात हुंडा अॅक्ट आणि तीन तलाकची केस सुरू आहे. पत्नीला शंका होती की, तिच्या पतीचं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर सुरू आहे. त्यामुळे हे सत्य उघड करण्यासाठी ती गेल्या काही दिवसांपासून पतीचा पाठलाग करत होती. जेव्हा तिने पतीला जिममध्ये दुसऱ्या महिलेसोबत पाहिलं तर  तिचा राग अनावर झाला आणि तिने तिथेच दोघांची धुलाई केली. सध्या पोलिसांनी पत्नी आणि गर्लफ्रेन्ड विरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली आहे. 

Web Title: MP : Wife beat up husband and his girlfriend in gym, video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app