शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

MP Politics: मध्य प्रदेशात राजकीय भूकंप; मुख्यमंत्री कमलनाथ यांनी घेतले सर्व मंत्र्यांचे राजीनामे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 06:55 IST

Madhya Pradesh Political Crisis: ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नाराजीमुळे काँग्रेसचे १७ आमदार बंगळुरुला आहेत. त्यामुळे कमलनाथ सरकारवर टांगती तलवार आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी रात्री उशीरा कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत. आणि ते मान्यही करण्यात आले आहेत. 

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नाराजीमुळे काँग्रेसचे १७ आमदार बंगळुरुला आहेत. त्यामुळे कमलनाथ सरकारवर टांगती तलवार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मध्यप्रदेशातील भाजपाने मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता आमदारांची बैठक बोलावली आहे. कमलनाथ यांनी सांगितले की, जे लोक माफियाच्या मदतीने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना कधी यशस्वी होऊ देणार नाही. माझी सर्व ताकद आणि विश्वास मध्य प्रदेशातील जनतेचे प्रेम आहे. त्यामुळे लोकांनी बनवलेल्या या सरकारला पाडण्याचं स्वप्न कधी पूर्ण होऊ शकणार नाही असं ते म्हणाले. 

काय आहे कमलनाथ यांची योजना?कमलनाथ हे सरकारवर आलेल्या संकटापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात नाराज चेहरे सामावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांसह काँग्रेसच्या एकूण १७ आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. हे मंत्री आणि आमदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटातील असून, स्वत: शिंदेही बंडाच्या पावित्र्यात असून, त्यांनी भाजपाच्या एका बड्या नेत्याची भेट घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान, शिंदे यांची समजूत घालण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच राज्यात उदभवलेल्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याशी चर्चा केली आहे.

मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे असे एकूण तीन गट आहेत. दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना आपापल्या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून ज्योतिरादित्य शिंदे यांची मध्य प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांवरून ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारवर टीका केली होती. तसेच सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचाही इशारा दिला होता. तेव्हा कमलनाथ यांनीही ज्यांना रस्त्यावर उतरायचे आहे त्यांनी उतरावे असे आव्हान दिले होते. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा