शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

गंगा नदी स्वच्छ करताना मोदी सरकारचा 'भलताच' पराक्रम; वाचून डोक्यावर हात माराल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 5:25 PM

गंगा स्वच्छतेसाठी अभियान राबवणाऱ्या सरकारचा अजब गजब पराक्रम

नवी दिल्ली: गंगा स्वच्छतेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विशेष प्राधान्य दिलं. त्यासाठी नमामि गंगे अभियानाची सुरुवात केली. देशातील कोट्यवधी लोकांची जीवनवाहिनी असलेल्या गंगेला प्रदूषणमुक्त करण्यासाठी या अभियानाची सुरुवात करण्यात आली. याच गंगा नदीच्या स्वच्छतेदरम्यान मोदी सरकारनं एक भलताच पराक्रम केला आहे. तमिळनाडूतील डीएमके पक्षाचे राज्यसभेतील खासदार पी. विल्सन यांनी याबद्दलची माहिती ट्विटरवरून दिली आहे. ती वाचून तुम्ही डोक्यावर हात मारुन घ्याल.

राज्यसभेचे खासदार असलेले विल्सन यांनी तमिळनाडूचे सॉलिसिटर जनरल म्हणून काम केलं आहे. त्यांनी ऍडव्हॉकेट जनरल पददेखील भूषवलं आहे. विल्सन यांनी २१ जुलैला संसदेत एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला मिळालेलं उत्तर पाहून ते हैराण झाले. तमिळनाडूमधून गंगा नदी वाहत नसताना राज्यात तिच्या स्वच्छतेवर निधी खर्च केला जात असल्याची माहिती विल्सन यांना सरकारकडून देण्यात आली.

तमिळनाडूत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या (सीएसआर) अंतर्गत करण्यात आलेल्या खर्चात स्वच्छ गंगा निधीचाही समावेश आहे. विल्सन यांनी तमिळनाडूत खर्च झालेला सीएसआर निधी आणि प्रकल्पांच्याबद्दल प्रश्न विचारला होता. निधी नेमका कुठे खर्च करण्यात आला, असा त्यांचा सवाल होता. सीएसआर निधीतील काही हिस्सा गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी खर्च झाल्याचं उत्तर त्यांना मिळालं. त्यांनी हे उत्तर ट्विटरवर शेअर केलं आहे. गंगा नदी तमिळनाडूतून वाहते याची मला कल्पना नव्हती, असा टोला त्यांनी ट्विटमधून लगावला आहे.

तमिळनाडूत गंगा नदीच्या स्वच्छतेवर किती खर्च?सरकारनं आकडेवारीसह दिलेला तपशीलदेखील खासदार विल्सन यांनी सोबत जोडला आहे. त्यात खर्च करण्यात आलेल्या सीएसआर निधीची माहिती आहे. आर्थिक वर्ष २०२० मध्ये ०.२६ कोटी म्हणजेच २६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. २०१८ आणि २०१९ या दोन वर्षात प्रत्येकी १३ लाख रुपये खर्च केले गेले आहेत. म्हणजेच तीन वर्षांत ५२ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे तमिळनाडूतून गंगा नदी वाहतच नसताना ही रक्कम खर्च करण्यात आली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी