शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशातील काटकोन ओव्हरब्रिज; सोशल मीडियावर ट्रोल, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 17:09 IST

MP News: मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये उभारण्यात आलेल्या या पुलाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

MP News: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील ऐशबाग स्टेडियमजवळ बांधलेला रेल्वे ओव्हरब्रिज (आरओबी) गेल्या काही दिवसांपासून देशभरात चर्चेत आलाय. याचे कारण म्हणजे, या पुलाला चक्क ९० अंशांचे विचित्र वळण देण्यात आले आहे. अशाप्रकारच्या काटकोन पुलामुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे. या पुलाच्या आकारामुळे सोशल मीडियावर याला प्रचंड ट्रोल करण्यात आले.

दरम्यान, स्थानिकांनी अपघाताबाबत चिंता व्यक्त केली, मात्र या बांधकामाशी संबंधित अधिकाऱ्यांनी असा युक्तिवाद केला की, पुरेशी जमीन उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. परंतु आता रेल्वे विभागाने या पुलाचा आकार बदलण्यासाठी अतिरिक्त जमीन देण्यास सहमती दर्शविली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) सूत्रांनी सांगितले की, रेल्वेने जमीन दिल्यास पुलाची रेलिंग तोडून, त्याचा आकार बदलला जाईल. यामुळे वाहनांना वळण्यासाठी अतिरिक्त जागाही उपलब्ध होईल.

फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला१८ कोटी रुपये खर्चून बांधलेला हा रेल्वे ओव्हरब्रिज ६४८ मीटर लांब आणि ८.५ मीटर रुंद आहे. याचे फोटो सोशल मीडियावरील प्रचंड व्हायरल झाले. नेटकऱ्यांनी याच्या डिझाइनवर प्रश्न उपस्थित केला, तसेच हे वळण अपघातप्रवण क्षेत्र बनू शकते, अशी भीतीही व्यक्त केली. आता मात्र याचा आकार बदलला जाणार आहे.

काम कधी सुरू झाले?ऐशबाग रेल्वे क्रॉसिंग बंद झाल्यानंतर या भागात रेल्वे ओव्हरब्रिजची मागणी करण्यात आली होती. सरकारी निवेदनानुसार, या ओव्हरब्रिजचे बांधकाम २१ मार्च २०२३ रोजी सुरू झाले. भोपाळमधील ऐशबाग स्टेडियमसमोर असलेला हा रेल्वे ओव्हरब्रिज महामाई बाग आणि पुष्पा नगरसह स्टेशन परिसरातील लोकांसाठी उभारण्यात आला आहे. या ओव्हरब्रिजचे बांधकाम सुरू करताना सरकारने असे म्हटले होते की, यामुळे ऐशबाग परिसरातील लोकांना गेटवर थांबावे लागणार नाही, किंवा त्यांना लांब वळसा घ्यावा लागणार नाही. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशbhopal-pcभोपाळSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलBJPभाजपा