शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
4
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
5
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
6
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
7
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
8
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
9
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
10
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
11
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
12
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
13
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
14
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
15
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
16
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
17
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
18
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
19
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
20
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार

ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 17:37 IST

या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असून, अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असे विभागाने म्हटले आहे.

MP Police News:मध्य प्रदेशपोलिस विभागातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एक कॉन्स्टेबल १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही, तरीदेखील त्याला २८ लाख रुपये पगार मिळाला. हे प्रकरण विदिशा जिल्ह्यातील असून, सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या निष्काळजीपणात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे विभागाने म्हटले आहे.

सविस्तर माहिती अशी की, संबंधित पोलिस कॉन्स्टेबल २०११ मध्ये मध्य प्रदेश पोलिसात भरती झाला होता. भरतीनंतर त्याला भोपाळ पोलिस लाईनमध्ये तैनात करण्यात आले होते. पुढे सागर ट्रेनिंग सेंटरमध्ये पाठवण्यात आले. परंतु प्रशिक्षणाला पोहोचण्याऐवजी तो त्याच्या घरी निघून गेला अन् परतलाच नाही. त्याने जाण्यापूर्वी कोणत्याही अधिकाऱ्याला माहिती दिली नाही किंवा रजेसाठी अर्ज केला नाही. त्याची सर्व्हिस फाइल स्पीड पोस्टने भोपाळला पाठवली गेली, तिथे कोणत्याही चौकशीशिवाय फाईल स्वीकारण्यात आली.

१२ वर्षे कोणालाही पत्ता लागला नाहीविशेष म्हणजे, प्रशिक्षण केंद्रातील कोणत्याही अधिकाऱ्याला अनुपस्थितीबद्दल माहिती समजले नाही किंवा त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. अशाप्रकारे, त्याला वर्षानुवर्षे पगार मिळत राहिला. फुकट पगार मिळत होता, त्यामुळे त्यानेही इतक्या वर्षात पोलिस विभागाला याबाबत माहिती दिली नाही. 

कसा उघडकीस आला२०२३ मध्ये २०११ च्या बॅचचा पे ग्रेड रिव्ह्यू सुरू असताना हा घोटाळा उघडकीस आला. अधिकाऱ्यांना त्या कॉन्स्टेबलची कोणतीही फाईल किंवा सर्व्हिस रेकॉर्ड सापडला नाही. जेव्हा त्याला बोलावण्यात आले, तेव्हा त्याने दावा केला की, तो मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त आहे, म्हणून ड्युटीवर येऊ शकत नाही. त्याने काही वैद्यकीय कागदपत्रे देखील दाखवली.

प्रशिक्षणासाठी आलाच नाहीतपासाची जबाबदारी भोपाळच्या टीटी नगर भागात तैनात असलेल्या एसीपी अंकिता खटारकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की कॉन्स्टेबलने प्रशिक्षणाला जाण्याची परवानगी घेतली होती, परंतु तो कधीही परतला नाही. या कारणास्तव त्याची उपस्थिती नोंदवण्यात आली नाही, अन् तो रेकॉर्डमध्ये राहिला.

काय कारवाई केली?सध्या, कॉन्स्टेबलला भोपाळ पोलिस लाईनमध्ये ठेवण्यात आले असून, त्याच्याकडून १.५ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम त्याच्या येणाऱ्या पगारातून वजा केली जाईल. या प्रकरणाची चौकशी अजूनही सुरू आहे आणि या निष्काळजीपणात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असे विभागाने म्हटले आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस