शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

Video: खासदार Jaya Bachchan संतापल्या; जगदीप धनखड यांना दाखवलं बोटं, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 16:56 IST

जया बच्चन रागात सभापती जगदीप धनखड यांच्याकडे बोट दाखवून काहीतरी बोलल्या.

Jaya Bachchan : समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांना पुन्हा एकदा त्यांच्या वागणुकीमुळे आणि रागामुळे सोशल मीडिया युजर्सकडून ट्रोल केले जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये जया बच्चन राज्यसभेच्या कामकाजादरम्यान सभापती जगदीप धनखड यांच्याकडे बोट दाखवून काहीतरी बोलताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जया बच्चन जगदीप धनखड यांच्याकडे बोट दाखवताना दिसत आहेत. यासोबतच जया बच्चन त्यांच्या एक्सप्रेशन्सकडे लक्ष दिल्यानंतर त्या खूप संतापलेल्या दिसत होत्या. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर असंसदीय कृत्याबद्दल टीका होत आहे.

दरम्यान, सभागृहात गोंधळ घालणे आणि कामकाजाचे रेकॉर्डिंग केल्याच्या आरोपावरुन काँग्रेस खासदार रजनी पटेल यांना चालू अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांसाठी निलंबित करण्यात आले. या प्रकरणावर समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी विरोध करत काँग्रेस खासदाराला पाठिंबा दिला. रजनी यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही, असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी जगदीप धनखड यांना बोट दाखवले.

भाजपची टीकाजया बच्चन यांच्यावर आता सोशल मीडिया यूजर्ससह सत्ताधारी पक्ष भाजपचे नेते जोरदार टीका करत आहेत. छत्तीसगडच्या बिलासपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार आणि पक्षाच्या राज्य युनिटचे अध्यक्ष अरुण साव यांनी लिहिले की, जया बच्चन यांनी थिएटर आणि लोकशाहीचे सर्वोच्च व्यासपीठ यातील फरक ओळखावा. तिकडे, भाजपचे दिल्लीचे प्रवक्ते अयाज सेहरावत यांनी लिहिले की, राज्यसभा खासदार जया बच्चन यांचे वर्तन लज्जास्पद आहे.

पापाराझींवरही राग काढतातजया बच्चन संतापण्याची पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी मिसेस बच्चन यांनी परवानगीशिवाय फोटो क्लिक केल्यामुळे पापाराझींवर संताप व्यक्त केला होता. जया बच्चन पती अमिताभ बच्चन यांच्यासह मध्य प्रदेशातील इंदूर विमानतळावर पोहोचल्याचे एका व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत होते. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या मोबाईलवरुन त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले. हे पाहून जया म्हणाल्या, माझे फोटो काढू नकोस.

टॅग्स :Jaya Bachchanजया बच्चनRajya Sabhaराज्यसभाSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा