महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 06:49 IST2025-07-28T06:48:11+5:302025-07-28T06:49:49+5:30
लोकसभेत बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी १७ खासदारांना ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: लोकसभेत बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी १७ खासदारांना ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
संसदरत्न पुरस्कार मिळालेल्यांमध्ये राष्ट्रवादीच्या (श.प.) सुप्रिया सुळे, उद्धवसेनेचे अरविंद सावंत, शिंदेसेनेचे श्रीरंग अप्पा बारणे आणि नरेश म्हस्के, भाजपच्या स्मिता उदय वाघ आणि मेधा कुलकर्णी, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे.
ओडिशाचे भर्तृहरी महताब आणि केरळचे खासदार एन. के. प्रेमचंद्रन यांना विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात आला. भाजपचे निशिकांत दुबे, रवी किशन, प्रवीण पटेल, विद्युत बरन महतो व दिलीप सैकिया यांनाही पुरस्कृत केले गेले. मात्र, दुबे अनुपस्थित होते.