शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
2
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
3
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
4
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
5
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
6
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
7
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
8
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
9
'या' कर्मचाऱ्यांना आई-वडील, सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालण्यासाठी मिळणार रजा!
10
हे आहेत भारताचे सर्वात उंच ५ क्रिकेटर, दोघांची उंची जाणून तर तुम्हीही थक्क व्हाल...!
11
अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग
12
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
13
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं स्पष्ट
14
...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?
15
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन बिहारला मिळणार? लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; पाहा, वैशिष्ट्य
16
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
17
प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा
18
अनंत चतुर्दशी २०२५: घरच्या साहित्यात झटपट करा पेढ्याच्या चवीचे शाही मोदक; बाप्पा खुश आणि घरचेही 
19
रविवारपासून कोस्टल रोडवरही धावणार एसी बस; कोणकोणत्या स्टॉपवर थांबणार, भाडे किती?
20
झोमॅटो आणि स्विगीच्या ग्राहकांना बसणार फटका? डिलिव्हरी शुल्कावर लागणार नवा कर

खासदार इंजिनिअर राशिद तिहार कारागृहात ट्रान्सजेंडर्समुळे त्रस्त; 'ते' HIV पॉझिटिव्ह असल्याचा AIP चा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 16:15 IST

इंजिनिअर रशीदवर दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत केल्याचा आरोप आहे. एनआयएने त्याला बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत म्हणजेच यूएपीए अंतर्गत अटक केली आहे. तो 2019 पासून तुरुंगात आहे. त्याने २०२४ ची लोकसभा निवडणूक तुरुंगातूनच लढवली आणि जिंकलीही.

जम्मू-काश्मीरातील बारामुल्लाचे खासदार इंजिनिअर राशीद यांनी, तिहार तुरुंगात आपल्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी त्यांचे वकील जावेद हुब्बी यांना यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, तिहार कारागृह प्रशासनाने कश्मीरी कैद्यांना त्रास देण्यासाठी नव्या पद्धती शोधून काढल्या आहेत. त्यांच्या बॅरेकमध्ये जाणूनबुजून ट्रन्सजेंडर मंडळींना ठेवण्यात आले आहे. त्यांना भडकावण्यासाठी, हल्ला करण्यासाठी आणि शत्रुतापूर्ण वातावरण बनवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

अवामी इतिहाद पार्टी (एआईपी)च्या निवेदनानुसार, हुब्बी यांनी कारागृहात राशिदची भेट घेतल्यानंतर, दावा केला आहे की, "ट्रान्सजेंडर्सच्या एका समुहाने त्यांना धक्का देत त्यांच्या अंगावर गेट पाडले. यातून ते कसे-बसे वाचले. हे घातक ठरू शकले असते. हे त्यांना घातक साबित हो सकता था. हा त्यांना हानी पोहोचवण्याच्या प्रयत्नापेक्षा कमी नाही."

"नमाजच्या वेळीही त्रास देतात" - इंजिनिअर राशीद -याच बरोबर त्यांनी दावा केला की, "कश्मीरी कैदी जेव्हा नमाज पठन करायला सुरुवात करतात,  तेव्हाही ट्रान्सजेंडर त्रास देतात आणि त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतात. महत्वाचे म्हणजे, या ट्रान्सजेंडर्सना  एचआयव्ही पॉझिटिव्ह घोषित करण्यात आले आहे. तसेच त्यांना जाणून बुजून कश्मिरी कैद्यांसोबत ठेवण्यात आले आहे," असा दावाही त्यांनी केला आहे. इंजिनिअर रशीद यांच्या अवामी इत्तेहाद पक्षाने (एआयपी) संपूर्ण प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे आणि स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. 

इंजिनिअर रशीदवर दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत केल्याचा आरोप आहे. एनआयएने त्याला बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत म्हणजेच यूएपीए अंतर्गत अटक केली आहे. तो 2019 पासून तुरुंगात आहे. त्याने २०२४ ची लोकसभा निवडणूक तुरुंगातूनच लढवली आणि जिंकलीही. 

टॅग्स :Transgenderट्रान्सजेंडरjailतुरुंगPoliceपोलिसTerrorismदहशतवाद