शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

हिरव्या बांगड्या, टिकली, साडी अन्... नवरीसारखा मेकअप करुन विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 14:04 IST

मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एका विद्यार्थ्याचा मृतदेह विचित्र अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. कुटुंबियांना त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला.

Crime News :  मध्य प्रदेशच्या इंदूरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये शुक्रवारी रात्री एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या विद्यार्थ्याचा मृतदेह विचित्र अवस्थेत लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मृत्यूपूर्वी विद्यार्थ्याचा महिलेप्रमाणे मेकअप करण्यात आला होता. एखाद्या नववधूप्रमाणे, त्याच्या हातात हिरव्या बांगड्या, कपाळावर टिकली आणि साडी नेसली होती. त्याचे दोन्ही हात बांधलेले होते. विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी हा मृत्यू एका मोठ्या कटाचा भाग असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे.

भवर कुआँ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांती नगर भागातील हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. पुनीत दुबे असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. २१ वर्षीय पुनीत हा रायसेनचा रहिवासी होता. तो एमपीपीएससी परीक्षेची तयारी करत होता. पुनीत हा ३ वर्षांपासून इंदूरमध्ये राहून शिक्षण घेत होता. पुनीतच्या डोळ्यावर पट्टीही बांधली होती. मृतदेहाभोवती खूप रक्त पसरले होते. बांगड्या, टिकली लावून एखाद्या नववधूप्रमाणे तयार होऊन केलेल्या या आत्महत्येने पोलिसही कोड्यात सापडले आहे.दरम्यान, पुनीतच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

आत्महत्येच्या आदल्या दिवशी रात्री दहा वाजता पुनीतचे आईशी शेवटचे बोलणे झाले होते. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत तो कोचिंगमध्येच असायचा. मात्र शुक्रवारी रात्रीपासून त्याचा फोन बंद होता. बराच वेळ फोन न आल्याने पुनीतच्या कुटुंबीयांनी इंदूरमधील त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर पुनीतचे मित्र आणि त्याचे नातेवाईक इंदूरमधील फ्लॅटवर पोहोचले तेव्हा दरवाजा बंद होता. दरवाजा तोडून आत पाहिले असता त्यांना पुनीतचा मृतदेह फ्लॅटमध्ये सापडला. त्यानंतर या सगळ्या प्रकाराची पोलिसांना माहिती देण्यात आली.

दरम्यान, पुनीतने आठ दिवसांपूर्वीच त्याची खोली बदलली होती. याआधी तो दोन मित्रांसोबत राहत होता. त्याच्या मित्रांनी सांगितले की पुनीत असा कधीच वागत नव्हता. पण त्याला असं पाहून खूप आश्चर्य वाटते. पुनीतच्या कुटुंबियांच्या म्हण्यानुसार त्याच्यात कधीही बदल दिसला नाही किंवा जाणवला नाही. तो नेहमी मुलांसारखेच कपडे घालत होता. पुनीतचा खून झाल्याची भीती कुटुंबीयांनी पोलिसांकडे व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस