शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आवाज बदलून महिला प्राध्यापिका असल्याचे सांगितलं; ७ मुलींवर बलात्कार करणाऱ्याला अखेर अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 20:10 IST

मध्य प्रदेशात शिष्यवृत्तीच्या नावाखाली सात विद्यार्थीनींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Crime News : मध्य प्रदेशातून हादरवणारी घटना समोर आली आहे. शिष्यवृत्तीचे आमिष दाखवून सात आदिवासी मुलींवर बलात्कार करणाऱ्या ३० वर्षीय आरोपीला मध्य प्रदेशपोलिसांनी अटक केली. आरोपीने व्हॉईस चेंजिंग ॲपचा वापर करून त्यांना शिष्यवृत्तीची ऑफर देणारी महिला महाविद्यालयाची प्राध्यापक असल्याचे दाखवले. त्यानंतर आरोपीने जंगलात नेऊन आदिवासी मुलींवर अत्याचार केले. हा  सगळा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.

मध्य प्रदेश पोलिसांनी याप्रकरणी आरोपी ब्रजेश प्रजापती आणि इतर दोघांना अटक केली आहे. आरोपींच्या मदतीने ब्रजेशने पहिल्या पीडितेचा फोन नंबर घेऊन तिची फसवणूक केली होती. त्यानंतर आरोपीने ॲप स्टोअरवरच्या व्हॉइस चेंजिंग ॲप्लिकेशनचा वापर केला आणि त्याच्या मदतीने आपण महिला प्राध्यापिका असल्याचे दाखवून  विद्यार्थिनींना लक्ष्य केले. सर्व पीडित विद्यार्थिनी या आदिवासी समाजातील असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील आहेत. या सगळ्या प्रकारामुळे मध्य प्रदेशात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत चार पीडित विद्यार्थिनी पुढे आल्या आहेत. यासह आरोपीने आणखी तीन महिलांवर बलात्कार केल्याची कबुली दिली आहे. एका प्रकरणात आरोपीने एक विद्यार्थिीनी आणि तिच्या अल्पवयीन बहिणीला जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी त्यांच्यावर पॉक्सो कायदाही लावण्यात आला आहे. २४ मे रोजी प्रजापतीची कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी पुन्हा त्याच्या कोठडीची मागणी केली आहे.

पोलिसांच्या तपासात आरोपी हा मजूर असल्याचे समोर आलं आहे. आरोपीने यूट्यूबवर आवाज बदलण्याचं ॲप्लिकेशन कसे वापरायचे हे शिकून घेतले होते. त्यानंतर त्यान सहआरोपी राहुल प्रजापती आणि संदीप प्रजापती यांच्या मदतीने पहिल्या पीडितेचा फोन नंबर मिळवला, असे पोलिसांनी सांगितले. "आरोपीने विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे पैसे देण्याचे आश्वासन देऊन एका वेगळ्या ठिकाणी बोलावले. आपण एक महिला महाविद्यालयातील प्राध्यापक असल्याचे आरोपीने आवाज बदलून सांगितले होते. फोनवरुन बोलणाऱ्या आरोपीने विद्यार्थिनींना माझा मुलगा तुम्हाला भेटेल आणि आमच्या घरी घेऊन जाईल असे सांगितले होते. तिथेच त्यांना शिष्यवृत्तीचे पैसे मिळतील असेही सांगितले होते. त्यानंतर आरोपी पीडितेला जंगलातील एका निर्जन ठिकाणी न्यायचा. तिथे तो त्याच्या कुटुंबातील एका पडक्या झोपडीत त्यांच्यावर बलात्कार करायचा," अशी माहिती पोलिसांनी दिली.

"आरोपी पीडितेंचे फोनही घ्यायचा आणि कोणाला सांगितले तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी द्यायचा. आरोपी त्या मोबाईलमधून इतर विद्यार्थीनींचे फोन नंबर शोधत असत. तो दिवसातून १०-२० वेळा पीडितांशी बोलायचा. ज्या मुली कॉलेजला जायच्या नाहीत त्यांना जंगलात बोलवण्यासाठी सरकारी योजनांचे आमिष दाखवायचा," अशीही माहिती पोलिसांनी दिली. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या कॉल डिटेल्सचे विश्लेषण केले आणि त्याने ज्या नंबरवर वारंवार कॉल केले होते ते पाहिले. त्यामुळे पोलिसांना इतर पीडितांना शोधण्यात मदत झाली.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीScholarshipशिष्यवृत्तीPoliceपोलिस