शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
6
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
7
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
8
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
9
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
10
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
11
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
13
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
14
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
15
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
16
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
17
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
18
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
20
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले

मध्य प्रदेशमधलं कमलनाथ सरकार कोसळणार; शिंदे समर्थक 19 काँग्रेस आमदारांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 2:51 PM

शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यापाठोपाठ गोटातील 19 काँग्रेस आमदारांनी राजीनामा पाठवून दिला आहे.

ठळक मुद्दे शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यापाठोपाठ गोटातील 19 काँग्रेस आमदारांनी राजीनामा पाठवून दिला आहे. या 19 आमदारांमध्ये पाच मंत्र्यांचाही समावेश आहे. ज्यांनी मध्य प्रदेश विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.या राजीनाम्यानंतर कमलनाथ सरकार कोसळणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.

नवी दिल्ली- मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरच्या राज घराण्यातले राजपुत्र आणि काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा देऊन काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. शिंदे यांनी ट्विट करून राजीनाम्याची माहिती दिली आहे. शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यापाठोपाठ गोटातील 19 काँग्रेस आमदारांनी राजीनामा पाठवून दिला आहे. काँग्रेसचे आणखी सात आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत.   या 19 आमदारांमध्ये पाच मंत्र्यांचाही समावेश आहे. ज्यांनी मध्य प्रदेश विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. सध्या हे आमदार कर्नाटकातल्या बंगळुरूमध्ये आहे. या राजीनाम्यानंतर कमलनाथ सरकार कोसळणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. शिंदेंच्या या बंडखोरीनंतर काँग्रेसनं त्यांना गद्दार म्हटलं आहे.  ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या तासाभराच्या बैठकीनंतर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. तसेच ज्योतिरादित्य शिंदे समर्थक आमदारांनीही राजीनामे दिले आहेत. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीही तातडीनं बैठक बोलावली. शिंदेबरोबर गेलेल्या सहा मंत्र्यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी कमलनाथ यांनी राज्यपालांकडे केली आहे.18 वर्षांचा प्रवास मागे सोडून पुढे जाण्याची वेळ आली आहे. आता एक नवीन सुरुवात करायची आहे, असंही ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपला राजीनामा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडे सोपवला आहे. ज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर भाजपानं संध्याकाळी सीईसीची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत ज्योतिरादित्य शिंदेसुद्धा सहभागी होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशमध्ये 230 विधानसभेच्या जागा आहेत. त्यातील दोन आमदारांचं निधन झालं आहे. अशा प्रकारे विधानसभेत असलेल्या आमदारांची संख्या 228 आहे. काँग्रेसजवळ एकूण 121 आमदारांचं संख्याबळ आहे. ज्यातील 19 आमदारांनी राजीनामा दिला आहे. आता काँग्रेसकडे 102 आमदारांचं समर्थन आहे. तर भाजपाकडे 107 आमदार आहेत. 19 आमदारांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेश विधानसभेतल्या सदस्यांची संख्या 209 झाली आहे. त्यामुळे आता बहुमतासाठी 106 आमदारांची गरज आहे. अशातच भाजपाला पुन्हा सत्तेत येण्याची संधी आहे.  

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करा अन् मिळवा 10  हजार प्रतिमहिना पेन्शन, 31 मार्च अंतिम मुदत

'YES BANK लुटणाऱ्या उद्योजकांकडून भाजपाला कोट्यवधींचं डोनेशन', 'आप'ने दाखवली यादी

Video : कोरोना गो... गो कोरोना गो... व्हायरसला पळविण्यासाठी आठवलेंची प्रार्थना

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश