Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करा अन् मिळवा 10  हजार प्रतिमहिना पेन्शन, 31 मार्च अंतिम मुदत

'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करा अन् मिळवा 10  हजार प्रतिमहिना पेन्शन, 31 मार्च अंतिम मुदत

व्याजसुद्धा मासिक, तिमाही आणि सहामाही किंवा वार्षिक पर्यायांवर अवलंबून असतं. जर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास 31 मार्च 2020पर्यंत म्हणजे कमी कालावधी शिल्लक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 08:48 AM2020-03-10T08:48:48+5:302020-03-10T09:08:15+5:30

व्याजसुद्धा मासिक, तिमाही आणि सहामाही किंवा वार्षिक पर्यायांवर अवलंबून असतं. जर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास 31 मार्च 2020पर्यंत म्हणजे कमी कालावधी शिल्लक आहे.

investment tax pm pension yojana invest in government scheme and get pension rs 10000 per month vrd | 'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करा अन् मिळवा 10  हजार प्रतिमहिना पेन्शन, 31 मार्च अंतिम मुदत

'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करा अन् मिळवा 10  हजार प्रतिमहिना पेन्शन, 31 मार्च अंतिम मुदत

Highlights या सरकारी योजनेत गुंतवलेल्या पैशावर आपल्याला 8 ते 8.30 टक्के व्याज मिळतं. परंतु हे व्याजसुद्धा मासिक, तिमाही आणि सहामाही किंवा वार्षिक पर्यायांवर अवलंबून असतं. जर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास 31 मार्च 2020पर्यंत म्हणजे कमी कालावधी शिल्लक आहे.या योजनेची मर्यादा 10 वर्षांसाठी असेल. जर आपल्याला 10 वर्षांनंतरही ही योजना कार्यान्वित ठेवायची असल्यास पुन्हा या योजनेत गुंतवणूक करावी लागणार आहे.

नवी दिल्लीः निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर राहणं ही प्रत्येकाचीच गरज असते. त्यासाठी बाजारात अशाही काही योजना आहेत, ज्या फक्त निवृत्तीनंतरच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अशाच एका योजनेत पंतप्रधान वया वंदना (PMVVY)योजनेचा समावेश होतो. या सरकारी योजनेत गुंतवलेल्या पैशावर आपल्याला 8 ते 8.30 टक्के व्याज मिळतं. परंतु हे व्याजसुद्धा मासिक, तिमाही आणि सहामाही किंवा वार्षिक पर्यायांवर अवलंबून असतं. जर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास 31 मार्च 2020पर्यंत म्हणजे कमी कालावधी शिल्लक आहे.

या योजनेचे असे आहेत फायदेः
या योजनेची मर्यादा 10 वर्षांसाठी असेल. जर आपल्याला 10 वर्षांनंतरही ही योजना कार्यान्वित ठेवायची असल्यास पुन्हा या योजनेत गुंतवणूक करावी लागणार आहे. जर पेन्शन धारक या योजनेचा लाभ घेण्यासाठी 10 वर्षांपर्यंतही जिवंत राहिल्यास त्या संबंधित व्यक्तीला एरियरही दिला जाणार आहे. या योजनेतील कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच पेन्शन धारकाचा मृत्यू ओढावल्यास लाभार्थ्याच्या कुटुंबीयांना उर्वरित रक्कम परत केली जाणार आहे. या पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही लाभार्थी व्यक्ती जिवंत राहिल्यास त्याला पॉलिसीच्या खरेदी रकमेसह अंतिम पेन्शन हप्त्याहप्त्यानं दिली जाते.

केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ 60 वर्षं आणि त्याहून अधिक वयाचे वरिष्ठ नागरिक घेऊ शकतात. या योजनेसाठी जास्तीत जास्त वयाची काही मर्यादा नाही. या योजनेंतर्गत जर मासिक पेन्शन मिळवू इच्छित असल्यास महिन्याला कमीत कमी 1 हजार रुपयांची पेन्शन मिळू शकते. तसेच तुम्ही किती कालावधीसाठी पेन्शन मिळवणार आहात ते पेन्शनच्या रकमेवर अवलंबून असतं. या योजनेंतर्गत जास्तीत जास्त मासिक पेन्शन 10000 रुपये मिळते. 

  • LICच्या माध्यमातून मिळू शकतो या योजनेचा लाभ

आर्थिक वर्ष 2018-19च्या बजेटदरम्यान केंद्र सरकारनं वरिष्ठ नागरिकांच्या योजनेची अंतिम तारीख वाढवून 31 मार्च 2020 केली होती. त्याची सरकारनं जास्तीत जास्त मर्यादा वाढवून 15 लाख रुपये केली आहे. आपण ही योजना भारतीय जीवन विमा निगम (LIC)च्या माध्यमातूनही घेऊ शकतो. तसेच ही सुविधा ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीनंही मिळवता येते.

  • या लोकांना मिळणार पेन्शन

प्रधानमंत्री वय वंदना योजना म्हणजेच PMVVYमध्ये पेन्शनचं वय 60 वर्षं ठेवण्यात आलं आहे. या योजनेत जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवणूक करता येते.  

  • अशा प्रकारे करा अर्ज

पंतप्रधान वय वंदना योजनेच्या अर्जसाठी ग्राहकांना (भारतीय जीवन बीमा निगम) LICची वेबसाइट  लिंक https://eterm.licindia.in/onlinePlansIndex/pmvvymain.do जावे लागणार आहे. इथून योजनेचा फॉर्म घेतल्यानंतर तो भरून गरजेचा दस्तावेज लागोपाठ LICच्या कोणत्याही कार्यालयात जाऊन जमा करता येणार आहे. या योजनेसाठी ऑनलाइन सुविधाही देण्यात आली आहे. 

  • PMVVY योजनेत गुंतवणुकीसाठी लागतात ही कागदपत्रं

    1. वास्तव्याचा पुरावा
     

    2.पॅन कार्डची कॉपी

    3. बँकेच्या चेकची कॉपी किंवा बँक पासबुकच्या पहिल्या पानाची कॉपी

  • इतकी असेल पेन्शन

या योजनेंतर्गत कमीत कमी 1 हजार रुपये आणि जास्तीत जास्त 10 हजार रुपयांपर्यंत पेन्शन दिली जाते. ग्राहकाला प्रतिमहिना 1 हजार रुपये पेन्शन हवी असल्यास त्याला1,50,000 रुपये जमा करावे लागणार आहेत. तसेच जर ग्राहकाला 10,000 रुपये प्रतिमहिना पेन्शन हवी असल्यास 15,00,000 रुपये जमा करावे लागणार आहेत. 

  • जाणून घ्या किती मिळणार फायदा?

पंतप्रधान वय वंदना योजनेतील सदस्यांना वर्षाला 8 ते 8.30 टक्क्यांपर्यंत व्याज मिळतं. व्याजासकट परतावा हा ग्राहकानं पेन्शनसाठी भरलेली मासिक रक्कम, तिमाही, सहामाहीवर आधारित असतो. 

  • कर्ज घेण्याचीही सुविधा 

ग्राहकाला गुंतवणूक करून तीन वर्ष झाल्यास कर्ज घेण्याचीही सुविधा मिळते. तसेच दिलेलं कर्ज फेडण्याचीही एक विशिष्ट मुदत देण्यात येते. 

  • जाणून घ्या केव्हा मिळणार रक्कम

या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर 10 वर्षांनंतर शेवटच्या पेन्शनबरोबर जमा असलेली रक्कम सदस्याला परत केली जाते. 10 वर्षांपूर्वीच पेन्शन मिळवणाऱ्या लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास जमा राशी त्याच्या उत्तराधिकाऱ्याला मिळते.  

Web Title: investment tax pm pension yojana invest in government scheme and get pension rs 10000 per month vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.