शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ग्वाल्हेरनंतर भाजपाने आणखी तीन नगरपालिका गमावल्या; मध्य प्रदेशमध्ये आले नाकीनऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 15:45 IST

MP Civic Poll Election Result: ग्वाल्हेरनंतर भाजपासाठी मुरैनाची नगरपालिका महत्वाची होती. वर्षभरात मध्य प्रदेशमध्ये निवडणुका आहेत. यामुळे भाजपाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

मध्य प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील ११ पैकी चार महापालिका गमावणाऱ्या भाजपाला दुसऱ्या टप्प्यातदेखील मोठा धक्का बसला आहे. भाजपाने आणखी तीन नगर पालिका हातच्या गमावल्या आहेत. ओबीसी आरक्षणानंतर या निवडणुका झाल्या आहेत. 

दुसऱ्या टप्प्यात मुरैना, रीवा आणि कटनी या तीन नगरपालिका भाजपाने गमावल्या आहेत. या दोन ठिकाणी काँग्रेस तर एका ठिकाणी अपक्षांची सत्ता आली आहे. ग्वाल्हेरनंतर भाजपासाठी मुरैनाची नगरपालिका महत्वाची होती. कारण केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या मतदार संघातील ही महत्वाची पालिका होती. ग्वाल्हेर ही ज्योतिरादित्य शिंदेंची महापालिका होती. मुरैनामध्ये ४७ वार्डांपैकी १९ वर काँग्रेस, १५ वर भाजपा आणि आठ वर बसपा जिंकली आहे. तीन अपक्ष तर एका जागेवर आपचा उमेदवार जिंकला आहे. 

मध्य प्रदेशमध्ये महापौरांची निवडणूक ही थेट केली जाते. जनता थेट महापौर निवडते.  राज्यात १६ पालिकांच्या निवडणुका झाल्या. यामध्ये सात नगरपालिका भाजपाने गमावल्या आहेत. या सर्व पालिकांवर भाजपाची अनेक वर्षे सत्ता होती. ग्लाल्हेर, जबलपूर, छिंदवाडा, रीवा, मुरैना, कटनी आणि सिंगरौली या पालिका भाजपाने गमावल्या आहेत. पाच पालिका या काँग्रेसने जिंकल्या आहेत. मध्य प्रदेशमध्ये वर्षभरानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. यामुळे भाजपाला चिंतेत टाकणारी तर काँग्रेसला बळ देणारी ही निवडणूक ठरली आहे. भाजपाच्या ताब्यात इंदौर, भोपाळ, बुरहानपुर, उज्जैन, सतना, खंडवा आणि सागर या महापालिका गेल्या आहेत. ग्वाल्हेरमध्ये ५७ वर्षांनी भाजपाची सत्ता गेली आहे. जबलपूरमध्ये २३ वर्षांनी भाजपाचा महापौर नसणार आहे. 

ग्वाल्हेर का बोचणारे...ग्वाल्हेरमधून दोन केंद्रीय मंत्री, राज्य सरकारचे पाच मंत्री येतात. एवढी सत्ता एकवटलेली असतानाही ग्वाल्हेर गमावल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. शहरी मतदारांवर भाजपाचा मोठा पगडा आहे, असे असले तरी देखील काँग्रेसचा उमेदवार जिंकल्याने आश्चर्य व्य़क्त केले जात आहे. ग्वाल्हेरच्या विजयाचे श्रेय सतीश सिकरवार यांना दिले जात आहे. त्यांची पत्नी शोभा शर्मा यांनी भाजपाच्या सुमन शर्मा यांचा पराभव केला. शर्मा या नरेंद्र सिंह तोमर यांच्या समर्थक होत्या. तर ज्योतिरादित्यांना माया सिंह यांना निवडणुकीत उतरवायचे होते. परंतू, तोमर यांनी राजकारण करून शिंदेंचा पत्ता कट केला आणि पक्षाला सुमन शर्मा यांना उतरविण्यास भाग पाडले. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस