शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक जिंकणाऱ्या भाजपाला मध्य प्रदेशात धक्का; २ आमदारांचं काँग्रेसला मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 19:28 IST

भाजपाच्या आमदारांचं काँग्रेसच्या बाजूनं मतदान

भोपाळ: कर्नाटकात काँग्रेस, जेडीएस सरकार कोसळल्यानंतर मध्य प्रदेशातही याचीच पुनरावृत्ती घडेल, असा दावा करणाऱ्या भाजपाला धक्का बसला. कर्नाटकात ऑपरेशन लोटस राबवल्यानंतर मध्य प्रदेशात 'ऑपरेशन कमलनाथ' सुरू केलं जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र विधानसभेत गुन्हेगारी कायदा (सुधारणा) विधेयकावरील मतदानावेळी भाजपाच्या दोन आमदारांनी काँग्रेस सरकारला साथ दिली. यावरुन मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपावर निशाणा साधला. काँग्रेसकडून अल्पमतातलं सरकार चालवलं जातं. त्यांचं सरकार कधीही कोसळेल, असा दावा कायम भाजपाकडून केला जातो. मात्र विधानसभेत गुन्हेगारी कायद्यावरील सुधारणा विधेयकावरील मतदानादरम्यान भाजपाच्याच दोन आमदारांनी सरकारच्या बाजूनं मतदान केलं, असा टोला कमलनाथ यांनी लगावला. या विधेयकावरील मतदानादरम्यान कमलनाथ यांनी मतविभाजनाची मागणी केली होती. ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी मान्य केली.  आज विधानसभेत सुधारणा विधेयकावर मतदान झालं. त्यावेळी भाजपाच्या दोन आमदारांनी सरकारच्या बाजूनं मतदान केलं. यामुळे भाजपाच्या गोटात अस्वस्थता होती. तर कर्नाटक गमावलेल्या काँग्रेसला भाजपावर टीका करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे कालच भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील काँग्रेस सरकार कोसळू शकतं, असे संकेत दिले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या सपा-बसपामधील अंतर्गत लाथाळ्यांचा उल्लेख केला होता. 'आम्ही इथे (मध्य प्रदेशात) सरकार पाडणार नाही. काँग्रेस सरकार पडण्यास त्यांचेच नेते जबाबदार आहेत. राज्यात काँग्रेस आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या बसपा-सपामध्ये अंतर्गत वाद आहेत. त्यामुळे या ठिकाणी काही घडल्यास आम्ही काहीही करू शकत नाही,' असं म्हणत चौहान यांनी अप्रत्यक्षपणे 'ऑपरेशन लोटस'चे संकेत दिले होते. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचं वातावरण होतं. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपाKarnatak Politicsकर्नाटक राजकारण