शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेचं कामकाज न झाल्यास भत्ताही नाही; सरकारच्या नव्या प्रस्तावाला भाजपाचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 15:50 IST

सरकार दबावाचं राजकारण करत असल्याचा भाजपाचा आरोप

विधिमंडळात होणारा गदारोळ आणि त्यामुळे सदनाचा वाया जाणारा वेळ हे काही नवं नाही. आमदारांनी गोंधळ घातल्यामुळे अनेकदा विधिमंडळाचं कामकाज होत नाही आणि जनतेचे प्रश्न तसेच राहतात. याला चाप लावण्यासाठी कामकाज नाही, तर भत्ता नाही, असा नवा नियम लागू करण्याचा प्रयत्न मध्य प्रदेश सरकारकडून सुरू आहे. हा नवा नियम लागू झाल्यास विधानसभेच्या कामकाजात अडथळा आणणाऱ्या आमदाराला भत्ता मिळणार नाही. काँग्रेस सरकार नवा नियम लागू करण्याच्या प्रयत्नात असताना भाजपानं याला जोरदार विरोध केला आहे. सरकारकडून दबावाचं राजकारण होत असल्याचा भाजपाचा आरोप आहे. मध्य प्रदेशात अधिवेशनादरम्यान प्रत्येक आमदाराला प्रति दिन दीड हजार रुपये इतका भत्ता मिळतो. सध्या काँग्रेस सरकारकडून 'कामकाज नाही, तर भत्ता नाही' हा नियम लागू करण्याचा प्रयत्न होत असताना त्याला भाजपाचा विरोध आहे. मात्र भाजपा सत्तेत असताना त्यांच्याकडूनदेखील हाच नियम लागू करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी त्यांना अपयश आलं होतं. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या मंत्रिमंडळात कायदा मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पी. सी. शर्मा यांनी याबद्दलची माहिती विधानसभा अध्यक्षांना पाठवली आहे. त्यामुळे आता पुढचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष घेतील, असं शर्मांनी सांगितलं. विधानसभेत आमदारांकडून घातला जाणारा गोंधळ थांबवणं अतिशय महत्त्वाचं आहे. विधानसभेच्या अध्यक्षांना याबद्दलची कल्पना आहे. त्यामुळे ते लवकरच नव्या नियमाची अंमलबजावणी करतील, असं शर्मा यांनी म्हटलं. मध्य प्रदेशात जवळपास १५ वर्षे भाजपाची सत्ता होती. मात्र गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तांतर झालं. सध्या विधानसभेत काँग्रेसचे ११५ आमदार आहेत. काँग्रेस सरकारला ४ अपक्ष आमदारांसह बसपाच्या २ आणि सपाच्या एका आमदाराचा पाठिंबा आहे. विरोधी बाकांवर असलेल्या भाजपाचे १०८ आमदार आहेत. त्यामुळे सदनात अनेकदा काँग्रेस विरुद्ध भाजपा हा सामना पाहायला मिळाला आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा