मेरी कोमवरील चित्रपट मणिपूरमध्येच झळकणार नाही
By Admin | Updated: August 20, 2014 16:30 IST2014-08-19T15:29:22+5:302014-08-20T16:30:45+5:30
पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिंपिकमधील कांस्य पदक विजेती बॉक्सिंगपटू मेरी कोमच्या जीवनावर आधारीत चित्रपट तिच्या राज्यात अर्थात मणिपूरमध्येच प्रदर्शित होणार नाही.

मेरी कोमवरील चित्रपट मणिपूरमध्येच झळकणार नाही
ऑनलाइन लोकमत
इंफाळ, दि. १९ - पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिंपिकमधील कांस्य पदक विजेती बॉक्सिंगपटू मेरी कोमच्या जीवनावर आधारीत चित्रपट तिच्या राज्यात अर्थात मणिपूरमध्येच प्रदर्शित होणार नाही. मणिपूरमध्ये २००० पासून मणिपूरमध्ये हिंदी चित्रपटांवर बंदी असून मेरी कोम या चित्रपटासाठीदेखील ही बंदी शिथील करण्यात येणार नसल्याचे समजते. त्यामुळे मणिपूरी कन्येची ही यशोगाथा मणिपूरी जनतेलाच बघता येणार नाही.
बॉक्सिंगपटू मेरी कोमच्या यशस्वी कारकिर्दीवर संजयलीला भन्साली यांनी मेरी कोम या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रियंका चोप्रा पडद्यावरील मेरी कोम साकारणार असून ओमंग कुमारने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मणिपूरमध्ये अत्यंत कठीण परिस्थितून बॉक्सिंगमध्ये प्रावीण्य मिळवणा-या मेरी कोमची ही यशोगाथा पडद्यावर साकारली जात असल्याने याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र मेरी कोमच्या मणिपूरमध्येच हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार मणिपूरमध्ये २००० सालापासून बॉलिवूडमधील हिंदी चित्रपट आणि भाषेवर बंदी टाकण्यात आली आहे. आश्चर्यजनक बाब म्हणजे यातून मेरी कोमच्या चित्रपटालाही दिलासा देण्यात आलेला नाही. चित्रपटात मणिपूरमधील कलाकारांना घेण्यात आलेले नाही, मेरी कोम आणि प्रियंका चोप्रात कोणतेच साधर्म्य नाही यामुळेदेखील मणिपूरमधील काही लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.