भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीचे भाजप खासदार गौतम गंभीर यांनी दिल्लीतील न्यू अशोक नगर या भागात जन रसोई कॅन्टिनची सुरूवात केली आहे. यापूर्वीही त्यांनी एका जन रसोई कॅन्टिनची सुरूवात केली होती. गौतम गंभीर यांनी गेल्या वर्षी २४ डिसेंबर २०२० रोजी आपल्या भागात जन रसोईची सुरूवात केली होती. गौतम गंभीर फाऊंडेशनद्वारे लोकांना या ठिकाणी केवळ एका रूपयात पोटभर जेवण उपलब्ध करून देण्यात येतं. दिल्लीत आतापर्यंत दोन ठिकाणी जन रसोई या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या या दोन्ही जन रसोई कॅन्टिनद्वारे दररोज जवळपास २ हजार लोकांना स्वच्छ आणि पौष्टीक अन्न मिळणार आहे. पोट भरलेलं असेल तर जगातील कोणत्याही ताकदीशी आपण लढू शकू, असं त्यांनी उद्घाटनादरम्यान सांगितलं.
केवळ एका रूपयांत मिळणार पोटभर जेवण; गौतम गंभीरनं सुरू केली 'जन रसोई'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 18:17 IST
Gautam Gambhir Jan Rasoi : सर्वांना जेवण या संकल्पनेअंतर्गत सुरू करण्यात आली दुसरी 'जन रसोई'
केवळ एका रूपयांत मिळणार पोटभर जेवण; गौतम गंभीरनं सुरू केली 'जन रसोई'
ठळक मुद्देसर्वांना जेवण या संकल्पनेअंतर्गत सुरू करण्यात आली दुसरी 'जन रसोई'डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात आली होती पहिली जन रसोई