जिल्हा परिषदेत धरणे आंदोलन
By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:45+5:302015-08-08T00:23:45+5:30
लातूर : संधी निकेतन शिक्षण संस्था वडगाव संचलित उदगीर तालुक्यातील कौळखेडा येथील प्रेरणा निवासी मतिमंद व जीवन विकास मतिमंद शाळेत विद्यार्थ्यांची गैरसोय केली जात असून, यामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे़ त्यामुळे या संस्थेची चौकशी समिती नेमुन चौकशी करण्यात यावी़ तसेच या संस्थेची मान्यता रद्द करुन या ठिकाणी प्रशासक नेमण्यात यावा, होत असलेल्या गैरव्यवहाराबाबात चौकशी करण्यात यावी, चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत़ या मागणीसाठी उदगीर येथील बालाजी भोसले, सुनिल पाटील, उत्तम बिराजदार, गोविंद भोसले आदी जिल्हा परिषद परिसरात धरणे आंदोलन करीत आहेत़ आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे़

जिल्हा परिषदेत धरणे आंदोलन
ल तूर : संधी निकेतन शिक्षण संस्था वडगाव संचलित उदगीर तालुक्यातील कौळखेडा येथील प्रेरणा निवासी मतिमंद व जीवन विकास मतिमंद शाळेत विद्यार्थ्यांची गैरसोय केली जात असून, यामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे़ त्यामुळे या संस्थेची चौकशी समिती नेमुन चौकशी करण्यात यावी़ तसेच या संस्थेची मान्यता रद्द करुन या ठिकाणी प्रशासक नेमण्यात यावा, होत असलेल्या गैरव्यवहाराबाबात चौकशी करण्यात यावी, चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत़ या मागणीसाठी उदगीर येथील बालाजी भोसले, सुनिल पाटील, उत्तम बिराजदार, गोविंद भोसले आदी जिल्हा परिषद परिसरात धरणे आंदोलन करीत आहेत़ आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे़