मोटरसायकलची ॲक्टीव्हाला धडक
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:17+5:302015-01-29T23:17:17+5:30
युवकाचा करुण अंत : तिघे गंभीर जखमी

मोटरसायकलची ॲक्टीव्हाला धडक
य वकाचा करुण अंत : तिघे गंभीर जखमी नागपूर : अनियंत्रित मोटरसायकलची समोरच्या ॲक्टीव्हाला धडक बसल्यामुळे मोटरसायकलचालकाचा जागीच मृत्यू झाला तर, तिघे गंभीर जखमी झाले. आज दुपारी १२.१५ च्या सुमारास बेलतरोडी मार्गावरील रुद्र बारसमोर हा भीषण अपघात घडला.सुरेंद्रनगरातील देवेंद्र चेताराम डहेरिया (वय ४६) हे पत्नीसह ॲक्टीव्हाने मनीषनगरातून रामेश्वरीकडे जात होते. श्यामनगर भंडारे सभागृहासमोर राहणारा बंटी ऊर्फ अनिकेत गजानन शेंडे (वय १७) हा रंजित इंगळेसह पल्सरने (एमएच ३१/ डीपी ९८९४) वेगात आला. भरधाव पल्सरने डहेरियाच्या ॲक्टीव्हाला धडक दिली. त्यामुळे बंटी, रवींद्र आणि डहेरिया दाम्पत्य गंभीर जखमी झाले. वर्दळीच्या मार्गावर घडलेल्या या अपघातामुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमली. हुडकेश्वर पोलीसही पोहचले. जखमींना मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी बंटी शेंडेला मृत घोषित केले. तिघांवर उपचार सुरू आहेत. या अपघाताला बंटीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे जखमींनी सांगितल्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या अपघाताबाबतची विस्तृत माहिती रात्रीपर्यंत हुडकेश्वर पोलिसांकडून मिळू शकली नाही. ----