गतिरोधकांवर वाहनांची आदळआपट

By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:23+5:302015-09-01T21:38:23+5:30

वडाळारोड : प्रमाणापेक्षा अधिक उंची; पालिकेचे दुर्लक्ष

Motor Vehicles on Speed ​​Breaks | गतिरोधकांवर वाहनांची आदळआपट

गतिरोधकांवर वाहनांची आदळआपट

ाळारोड : प्रमाणापेक्षा अधिक उंची; पालिकेचे दुर्लक्ष
नाशिक : वडाळारोडवरील एका तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या अलीकडे महापालिकेच्या वतीने दुतर्फा गतिरोधक बसविण्यात आले आहेत; मात्र या गतिरोधकांची उंची प्रमाणापेक्षा अधिक असल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, गतिरोधकांची उंची कमी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
वडाळा चौफु ली ते उर्दू शाळेपर्यंत मुख्य वडाळा रस्त्यावर कोठेही गतिरोधक नसून केवळ या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरील गतिरोधकांचा आगाऊ अंदाज येत नसल्याने वाहने आदळू लागली आहेत. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून, तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भरधाव वेगाने होणार्‍या वाहतुकीला गतिरोधकांमुळे लगाम बसला आहे; मात्र अपघात टाळण्याचा उद्देश अपूर्ण असल्याचे बोलले जात आहे. कारण गतिरोधकाची प्रमाणापेक्षा अधिक उंची, गतिरोधक लक्षात यावे यासाठी अलीकडे झेब्रा प˜्यांचा अभाव, गतिरोधक ांवर रेडियम बसविण्याकडे करण्यात आलेले दुर्लक्ष अशा कारणांमुळे गतिरोधकांची सोयऐवजी गैरसोयच अधिक होत आहे. एक ापाठोपाठ तीन गतिरोधक बसविले आहे. उंची अधिक असल्यामुळे दुचाकी, तीनचाकी वाहनांना गतिरोधक ओलांडताना अपघात होत आहेत. कारण वाहनांचा वेग पूर्णत: कमी करण्याशिवाय पर्याय नसतो, अशावेळी तोल जाऊन पडण्याचा धोका निर्माण होतो. मागील वाहन भरधाव वेगाने थेट गतिरोधक ओलांडणार्‍या वाहनाजवळ येऊन थांबते. त्यामुळे मागून येणारी वाहने पुढील वाहनांवर धडकण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिका व पोलीस प्रशासनाने सदर गतिरोधक सुरक्षित करण्याची गरज आहे. गतिरोधकाच्या प्रारंभी पांढरे प˜े, तसेच रात्रीच्या वेळी गतिरोधक दिसावे म्हणून रेडियम लावण्याची मागणी होत आहे. त्याचप्रमाणे गतिरोधकापासून अलीकडे किमान पंधरा ते वीस फुटांवर प्रादेशिक परिवहन विभागाने ठरवून दिलेला चिन्हांकित फलकही लावणे आवश्यक आहेत.
इन्फो...............
वडाळा चौफुलीवर हवे गतिरोधक
मागील अनेक महिन्यांपासून वडाळा चौफुलीच्या प्रारंभी वडाळा-डीजीपीनगर-साईनाथनगर रस्त्यावर दोन्ही बाजूंनी गतिरोधक टाकण्याची मागणी केली जात आहे. मात्र या मागणीकडे पोलीस व पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या ठिकाणी गतिरोधक नसल्यामुळे वाहने भरधाव वेगाने जातात. वडाळागावातून ये-जा करणारी वाहने चौफुली ओलांडत असताना अपघात घडतात.

Web Title: Motor Vehicles on Speed ​​Breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.