शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मोटार वाहने दुरुस्ती विधेयक पुन्हा रखडले, नितीन गडकरी आरटीओ संघटनेवर संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 4:04 AM

दोन वर्षांपासून लोंबकळलेले मोटार वाहने (दुरुस्ती) विधेयक या वेळीही राज्यसभेत संमत होऊ शकले नाही.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : दोन वर्षांपासून लोंबकळलेले मोटार वाहने (दुरुस्ती) विधेयक या वेळीही राज्यसभेत संमत होऊ शकले नाही. भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी महत्त्वाचे असलेले हे विधेयक शुक्रवार, अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मात्र संमत झाले नाही. त्यामुळे संतापलेल्या गडकरी यांनी भ्रष्ट प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या (आरटीओ) संघटनेच्या गटावर राग व्यक्त केला.शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना गडकरी म्हणाले की, रस्ते अपघातांत मरण पावणाºया लक्षावधी लोकांचे प्राण वाचवणे आणि देशभर निर्माण झालेला भ्रष्टाचार रोखण्याचा उद्देश असलेले हे विधेयक या दबाब गटाने अडवून ठेवले. राज्यांच्या प्रत्येक तक्रारींचे निराकरण केल्यानंतर, संसदेच्या अनेक समित्यांकडून विधेयक गेल्यानंतर आणि विरोधकांच्या दुरुस्त्या केल्यानंतरही या दबाब गटाने कायदा होऊ दिला नाही.गडकरी म्हणाले, विधेयक अडवण्यात यश मिळवलेल्या भ्रष्ट आरटीओंच्या हावरटपणाचे समाधान मी कसे करणार? दरवर्षी अपघातांत दीड लाखांपेक्षा जास्त बळी जातात. अपघातांमध्ये भरडून निघालेल्या कुटुंबांना मी दिलासा दिला, अपघात घटवण्यासाठी पावले उचलली. परंतु, या दबाबगटाने विधेयक अडवल्याने मला धक्का बसला. विधेयक आधीच लोकसभेत संमत झाले आहे.>...तर भ्रष्टाचार थांबेलनोंदणीसाठी वाहन आरटीओकडे नेण्याची गरज नाही व संबंधित आरटीओकडे डीलर फीचा भरणा करील, असे या विधेयकात होते. या प्रस्तावामुळे खर्च वाचून भ्रष्टाचाराचे निर्मुलन झाले असते. आरटीओची यंत्रणा ही वाहनांची चाचणी घेण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या अपात्र असल्यामुळे वाहनाच्या तांत्रिक तपासणीची (टेक्निकल इन्स्पेक्शन) गरज नसल्याचे गडकरी यांनी प्रस्तावित केले होते.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी