Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 15:39 IST2025-05-01T15:39:20+5:302025-05-01T15:39:54+5:30
रस्त्यावर पलटलेल्या एका तेल टँकरमधून सोयाबीनचं तेल लुटण्यासाठी शेकडो लोक जमले होते. लोकांची मोठी झुंबड उडाली.

Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
बिहारमधील मोतिहारी येथून एक धक्कादायक घटना समोर आले आहे. रस्त्यावर पलटलेल्या एका तेल टँकरमधून सोयाबीनचं तेल लुटण्यासाठी शेकडो लोक जमले होते. लोकांची मोठी झुंबड उडाली. लोक बादल्या, गॅलन, बाटल्या आणि इतर मिळेल ती भांडी घेऊन आले आणि काही वेळातच तेलाचा संपूर्ण टँकर रिकामा केला. हे सर्व पोलिसांच्या उपस्थितीत घडलं. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छपवाहून रक्सौलला जाणारा सोयाबीन तेलाने भरलेला टँकर टोल प्लाझाजवळ एका ट्रॅक्टरला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना नियंत्रणाबाहेर गेला आणि पलटला. टँकर पलटताच त्यात भरलेलं तेल गळू लागलं. घटनास्थळाजवळील गावातील लोकांना हे कळताच त्यांनी ताबडतोब भांडी घेऊन तेल भरण्यासाठी धाव घेतली. घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
मोतिहारी में सोयाबीन तेल का टैंकर पलटने के बाद स्थानीय लोग बाल्टी, बोतल और कंटेनर की मदद से तेल को इकट्ठा करने के लिए दौड़ पड़े। खबर तेजी से फैली, जिससे वहां बड़ी भीड़ जमा हो गई और पुलिस ने स्थिति को नियंत्रित करने के लिए हस्तक्षेप किया, लेकिन लूटपाट हुई.#BiharNews#Motiharipic.twitter.com/jIEebtHE1R
— Khushbu_journo (@Khushi75758998) May 1, 2025
घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी संपूर्ण घटनेचे फोटो आणि व्हिडिओ देखील काढले. यामध्ये हे स्पष्टपणे दिसून येतं की पुरुष, महिला आणि अगदी लहान मुलंही हातात जे मिळेल ते घेऊन आले आणि तेल भरू लागतात. एकमेकांना मागे टाकण्याच्या शर्यतीत लोक एकमेकांशी धक्काबुक्की करतानाही दिसले. यावेळी पोलीसाचं पथकही घटनास्थळी उपस्थित होतं
टँकर चालक मोहम्मद साजिद खानने दिलेल्या माहितीनुसार, मी कोलकाताहून नेपाळमधील बीरगंजला जात होतो. अचानक समोरून एक ट्रॅक्टर आला आणि ब्रेक लावताच टँकर रस्त्याच्या कडेला पलटला. मी ताबडतोब पोलिसांना याबाबत माहिती दिली, पण पोलीस येईपर्यंत तेलाची लूट सुरू झाली होती.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस पथकाने लोकांना हटवण्याचा प्रयत्न केला, पण गर्दी इतकी होती की कोणीही ऐकायला तयार नव्हतं. शेतात आणि खड्ड्यांतून वाहणारे तेल गोळा करतानाही अनेक लोक दिसले. सध्या टँकरमधील उरलेले तेल काढून मार्ग मोकळा केला जात आहे आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.