(मदर्स डे)...आईची शिकवण हीच आयुष्याची शिदोरी
By Admin | Updated: May 9, 2014 21:13 IST2014-05-09T21:13:27+5:302014-05-09T21:13:27+5:30
प्रत्येक माणसाला आपली आई ही प्रिय असतेच. त्यामुळे आपणही यापेक्षा वेगळे नाही आहोत. माझी आई कोयना रघुनाथ माने ही कडक शिस्तीची. तिला वावगे असे खपायचे नाही. त्यामुळे लहानपणापासून तिचा आदरयुक्त धाक आपल्याला वाटायचा. ती अशिक्षित असली तरी आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे अशी तिची प्रबळ इच्छा. शिस्तप्रिय असल्याने घरातील शिस्त मोडलेली तिला चालायची नाही. स्वाभिमान, स्वावलंबन, शिस्त व नीतिमत्ता या चतु:सूत्रीचे बाळकडू आपल्याला लहानपणीच आईकडून मिळाले. तत्त्वांशी कधीही तडजोड करू नको, या तिच्याकडून मिळालेल्या शिकवणीचा आयुष्याच्या प्रवासातील बर्या-वाईट प्रसंगांत उपयोग होत आहे. तिच्याकडून मिळालेले नैतिक बळच आपली शिदोरी आहे.

(मदर्स डे)...आईची शिकवण हीच आयुष्याची शिदोरी
प रत्येक माणसाला आपली आई ही प्रिय असतेच. त्यामुळे आपणही यापेक्षा वेगळे नाही आहोत. माझी आई कोयना रघुनाथ माने ही कडक शिस्तीची. तिला वावगे असे खपायचे नाही. त्यामुळे लहानपणापासून तिचा आदरयुक्त धाक आपल्याला वाटायचा. ती अशिक्षित असली तरी आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे अशी तिची प्रबळ इच्छा. शिस्तप्रिय असल्याने घरातील शिस्त मोडलेली तिला चालायची नाही. स्वाभिमान, स्वावलंबन, शिस्त व नीतिमत्ता या चतु:सूत्रीचे बाळकडू आपल्याला लहानपणीच आईकडून मिळाले. तत्त्वांशी कधीही तडजोड करू नको, या तिच्याकडून मिळालेल्या शिकवणीचा आयुष्याच्या प्रवासातील बर्या-वाईट प्रसंगांत उपयोग होत आहे. तिच्याकडून मिळालेले नैतिक बळच आपली शिदोरी आहे.- राजाराम माने (जिल्हाधिकारी)(जिल्हाधिकारी राजाराम माने यांचा सिंगल फोटो वापरावा)