TikTok व्हिडीओ बनवण्यासाठी आई आपल्या मुलीवर करत होती अत्याचार, पतीने उचललं 'हे' पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 09:55 PM2021-09-12T21:55:30+5:302021-09-12T21:56:45+5:30

woman used to prank on the girl to make the video : पतीने सांगितले की, इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर प्रॅन्क व्हिडीओ बनवण्यासाठी त्याच्या पत्नीने ६ वर्षांच्या मुलीला इतके घाबरवले आहे की ती आता कोणाजवळ जाऊ इच्छित नाही.

The mother was abusing her daughter to make a TikTok video, the husband took the 'this' step | TikTok व्हिडीओ बनवण्यासाठी आई आपल्या मुलीवर करत होती अत्याचार, पतीने उचललं 'हे' पाऊल

TikTok व्हिडीओ बनवण्यासाठी आई आपल्या मुलीवर करत होती अत्याचार, पतीने उचललं 'हे' पाऊल

Next
ठळक मुद्देत्या व्यक्तीने सांगितले की, त्याची पत्नी स्वच्छता आणि स्वयंपाकघर यासारख्या घरगुती कामांचे लहान व्हिडिओ बनवते आणि त्यांना टिकटॉकवर पोस्ट करते.

नवी दिल्ली - आजकाल काही लोक सोशल मीडियाचे इतके वेडे झाले आहेत की, त्यांना समोर काय घडतंय हे काही दिसत नाही. असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जिथे एका पतीने सोशल मीडिया साईट Reddit वर लिहिले की, तो आपल्या पत्नीवर नाराज आहे आणि जर हे असेच चालू राहिले तर त्याला घटस्फोट घ्यावा लागेल. पतीने सांगितले की, इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर प्रॅन्क व्हिडीओ बनवण्यासाठी त्याच्या पत्नीने ६ वर्षांच्या मुलीला इतके घाबरवले आहे की ती आता कोणाजवळ जाऊ इच्छित नाही.

घरी बनवलेला व्हिडिओ
त्या व्यक्तीने सांगितले की, त्याची पत्नी स्वच्छता आणि स्वयंपाकघर यासारख्या घरगुती कामांचे लहान व्हिडिओ बनवते आणि त्यांना टिकटॉकवर पोस्ट करते. काही दिवसांपासून तिने मुलीसोबत खोड्या करण्यास सुरुवात केली, नंतर मुलीला बनावट भुत बनवून घाबरवले. मुलगी घाबरून रडू लागली. एवढं सगळं करूनही ती बाई हसत होती. त्या व्यक्तीने यासाठी आपल्या पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला पण तिने ऐकले नाही. त्रासलेल्या पतीने रेडिटवर आपले दुःख शेअर केले आणि लिहिले की, त्याची ६ वर्षांची मुलगी इतकी घाबरली आहे की ती आता तिच्या खोलीत एकटी झोपू शकत नाही.


समुपदेशन नाकारले
जेव्हा पतीने आपल्या काही फॉलोअर्सच्या मनोरंजनासाठी मुलांसोबत अशा खोड्या करणे थांबवण्यासाठी पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा या प्रकरणावरून महिलेने तिच्या पतीशी भांडण केले, पतीने सांगितले की त्याच्या पत्नीला काही हजार फॉलोअर्स मिळाले आहेत, त्यानंतर ती बदलली आहे. तिने यासाठी समुपदेशन करण्यासही नकार दिला. आता मुलाच्या कल्याणासाठी, पतीकडे फक्त घटस्फोटाचा मार्ग शिल्लक आहे.

लोकांनी प्रतिक्रिया दिल्या
रेडिटवर लिहिलेल्या या पोस्टवर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने पोस्टला उत्तर देताना लिहिले की, महिलेची अशी वृत्ती निंदनीय आहे. हे बाल अत्याचार आहे. तर दुसऱ्याने लिहिले की, विनोदांना त्यांची जागा आहे, परंतु अशा मुलांना घाबरवून व्हिडिओ बनवणे खूप चुकीचे आहे. बऱ्याच लोकांनी सांगितले की, टिकटॉक मुलांपेक्षा जास्त महत्वाचे नाही, या महिलेवर कारवाई झाली पाहिजे.


पत्नीच्या वागण्यामुळे व्यथित झालेल्या पतीने काही काळानंतर रेडडिटवर दुसरी पोस्ट टाकली ज्यात त्याने सांगितले की, त्याने या प्रकरणावर पत्नीशी बोलणं केलं आहे. पत्नीने तिच्या चुकीच्या वृत्तीबद्दल माफी मागितली आहे.

Web Title: The mother was abusing her daughter to make a TikTok video, the husband took the 'this' step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.