शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 09:12 IST

Who is Nimisha Priya? : डोळ्यात अनेक स्वप्न घेऊन निमिषा येमेनमध्ये गेली होती. तिने तिथे स्वतःचं क्लिनिक देखील सुरू केलं होतं. पण...

येमेनमध्ये एका भारतीय नर्सला फाशीची शिक्षा होणार असल्याची बातमी समोर आली आणि सगळ्यांच्याच काळजात धस्स झालं. निमिषा प्रिया असं या नर्सचं नाव असून, ती मूळची केरळची आहे. डोळ्यात अनेक स्वप्न घेऊन निमिषा येमेनमध्ये गेली होती. तिने तिथे स्वतःचं क्लिनिक देखील सुरू केलं होतं. पण, अचानक अशा काही घटना घडल्या, ज्यांनी तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. कधीकाळी आपल्या संसाराला आणखी फुलवण्यासाठी खूप मेहनत करणारी निमिषा आता फासावर चढणार आहे. येमेनच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या निमिषाला १६ जुलैला फाशी दिली जाणार आहे.

कोण आहे निमिषा प्रिया?निमिषा प्रिया ही एक भारतीय परिचारिका अर्थात नर्स आहे. ती मूळची केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील असून, २००८ मध्ये कामाच्या शोधात येमेनला गेली होती. निमिषाची आई कोचीमध्ये घरकाम करते. आपल्या कुटुंबाच्या आर्थिक अडचणी कमी करता याव्यात म्हणून निमिषा येमेनला काम करण्यासाठी गेली होती. येमेनमध्ये तिने अनेक रुग्णालयात काम केल्यानंतर, स्वतःचे क्लिनिक उघडण्याचा विचार केला. क्लिनिक उघडण्यासाठी, ती तलाल महदी नावाच्या येमेनी नागरिकाच्या संपर्कात आली आणि येथूनच सगळ्या गोष्टी चुकीच्या होऊ लागल्या.

येमेनमधील नियमांनुसार व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थानिक व्यक्तीसोबत भागीदारी करणे बंधनकारक आहे. मात्र, क्लिनिक सुरू झाल्यानंतर निमिषा आणि महदी यांच्यात वाद सुरू झाले. महदीने निमिषाला त्रास द्यायला सुरुवात केली. याबाबत निमिषाने एकदा तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र, तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने निमिषाला धमकवायला सुरुवात केली. 

याच महदीने निमिषाचा पासपोर्ट देखील काढून घेतला होता. निमिषाला सगळं सोडून भारतात परतायचं होतं. पण, पासपोर्ट नसल्याने ती काहीच करू शकत नव्हती. महदीकडून आपला पासपोर्ट परत मिळवण्यासाठी निमिषाने त्याला भूल देणारे इंजेक्शन दिले. मात्र, या औषधामुळे त्याचा मृत्यू झाला आणि निमिषा हत्येच्या आरोपात अडकली. महदीच्या मृत्यूनंतर निमिषाने येमेनमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पळून जाण्याचा प्रयत्न करताना तिला अटक करण्यात आली. येमेनच्या तुरुंगात आहे निमिषा!निमिषा प्रिया सध्या येमेन देशाची राजधानी साना येथील तुरुंगात आहे, जी हुथींच्या नियंत्रणाखाली आहे. २०१८मध्ये निमिषाला या प्रकरणात महदीच्या हत्येसाठी दोषी ठरवण्यात आले. ट्रायल कोर्टाने तिला येमेनी नागरिकाच्या हत्येसाठी दोषी ठरवले, त्यानंतर नोव्हेंबर २०२३मध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेनेही हा निर्णय कायम ठेवला.

येमेनी कायद्यांमध्ये "देशाच्या स्वातंत्र्य, एकता किंवा प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन करणे", "सशस्त्र दलांना कमकुवत करण्यासाठी कोणतेही कृत्य करणे", खून, अंमली पदार्थांची तस्करी, समलैंगिकता, धर्मत्याग किंवा इस्लाम नाकारणे आणि वेश्याव्यवसायाला प्रोत्साहन देणे यासारख्या विस्तृत गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाची तरतूद आहे.    

केस लढण्यासाठी आईने घर विकले!प्रियाची आई कोचीमध्ये घरकाम करते, तिने लेकीचा खटला लढण्यासाठी तिचे घर देखील विकले. जानेवारीमध्ये, केंद्राने म्हटले होते की, ते या प्रकरणाचे बारकाईने निरीक्षण करत आहेत आणि कुटुंबाला सर्वतोपरी मदत करत आहेत. निमिषाच्या आईने वेळ कमी आहे असे म्हणत, मदतीची विनंती देखील केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKeralaकेरळ