पाच रुपयांची चोरी केली म्हणून आईने मुलाला पेटविले
By Admin | Updated: June 3, 2015 18:58 IST2015-06-03T18:53:18+5:302015-06-03T18:58:41+5:30
दुकानातील खाऊ खाण्यासाठी फक्त पाच रुपयांची चोरी केली म्हणून स्वत:च्या सहा वर्षाच्या मुलाला आईनेच शिक्षा म्हणून रॉकेल ओतून पेटवून दिल्याचे वृत्त आहे.

पाच रुपयांची चोरी केली म्हणून आईने मुलाला पेटविले
>ऑनलाइन लोकमत
बिकानेर, दि. ०३ - दुकानातील खाऊ खाण्यासाठी फक्त पाच रुपयांची चोरी केली म्हणून स्वत:च्या सहा वर्षाच्या मुलाला आईनेच शिक्षा म्हणून रॉकेल ओतून पेटवून दिल्याचे वृत्त आहे. साहिल कुमार असे या मुलाचे नाव असून या घटनेत साहिल ४० टक्के भाजला आहे. त्याच्यावर येथील पीबीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिलने दुकानातील खाऊ खाण्यासाठी पाच रुपयांची चोरी करताना त्याच्या आईने पाहिले आणि रागाच्या भरात त्याला शिक्षा म्हणून घरातील आतील खोलीत नेऊन त्याच्या अंगावर रॉकेल ओतून आग लावून दिली. त्यानंतर त्याने आरडाओरडा केल्यानंतर त्यांच्या काकूने व आजीने पाहिले आणि त्याच्या अंगावर पाणी टाकून त्याला यापासून वाचविले. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी साहिलचा जबाब पोलिसांनी नोंदविला असून आईची चौकशी करत आहेत.