शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अरेरे! 3 मुलांची आई पाचव्या प्रियकरासह पळून गेली; शोधण्यासाठी नवऱ्याने लावले पोस्टर, म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 14:33 IST

महिलेचा पती आपल्या मुलांसह हातात पोस्टर घेऊन पत्नीचा शोध घेत आहे. मात्र अद्याप तिचा शोध लागलेला नाही.

उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये तीन मुलांची आई तिच्या पाचव्या प्रियकरासह पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेचा पती आपल्या मुलांसह हातात पोस्टर घेऊन पत्नीचा शोध घेत आहे. मात्र अद्याप तिचा शोध लागलेला नाही. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. पीडितेचा पती अनिल राजभर याने पोलिसांना सांगितले की, तो कामानिमित्त चंदीगडला गेला होता. तिथे त्याची रीना नावाच्या मुलीशी भेट झाली. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी मंदिरात लग्न केलं.

अनिलने सांगितले की, लग्नानंतर तो पत्नी रीनासोबत गावी आला आणि दोघेही आनंदाने राहू लागले. सर्व काही ठीक चालले होते आणि रीनाने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर दोन जुळ्या मुलांचाही जन्म झाला. लग्नाला 9 वर्षं झाली. रीना अनेकदा पतीला सांगायची की तिचे अनेक मित्र आहेत पण तिने त्या सर्वांना सोडले आहे कारण तिला तिचं संपूर्ण आयुष्य पतीसोबत घालवायचं आहे. अनिलने या गोष्टींकडे फारसं लक्ष दिले नाही कारण त्यांचे कौटुंबिक जीवन चांगले चालले होते. त्याचा आपल्या पत्नीवर पूर्ण विश्वास होता आणि त्याचे तिच्यावर खूप प्रेम होते.

पीडित अनिल राजभरने सांगितले की, तो जेव्हा कामानिमित्त बाहेर जायचा तेव्हा त्याची पत्नी कोणाशी तरी बोलायची. एके दिवशी त्याने आपल्या पत्नीला विचारलं की, ती कोणाशी इतके दिवस बोलत होती आणि ती त्याला टाळू लागली. त्यानंतर 3 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता रीनाला कोणाचा तरी फोन आला आणि ती घरातून निघून गेली. कामावरून परतल्यानंतर त्याला त्याची पत्नी घरी दिसली नाही, तेव्हा त्याने मुलांना आई कुठे आहे असं विचारलं.

बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्याने पत्नीचा इकडे-तिकडे शोध सुरू केला, मात्र ती कुठेच सापडली नाही, त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी पत्नी हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. महिना उलटून गेल्यानंतरही पोलिसांना या महिलेचा शोध लागलेला नाही. मुलगी चार वर्षांची असून दोन्ही मुलगे अवघे दोन वर्षांचे आहेत. अनिल राजभर सांगतो की, त्याच्या पत्नीने अनेकदा लग्न केलं आहे, ती जास्त काळ कोणासोबत राहू शकत नाही. ती 9 वर्षे त्याच्यासोबत राहिली आहे. रीनाने आतापर्यंत काही लोकांची फसवणूक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.