सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:50 IST2025-05-06T16:50:40+5:302025-05-06T16:50:51+5:30
तीन मुलांची आई असलेल्या एका महिलेचं १९ वर्षीय मुलावर जीव जडला आहे.

प्रातिनिधिक फोटो
प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. अशीच एक अजब घटना समोर आली आहे. तीन मुलांची आई असलेल्या एका महिलेचं १९ वर्षीय मुलावर जीव जडला आहे. खोरीमाहुआ उपविभागातील बैरियाजवळील सोना पहाडी गावात ही घटना घडली आहे. या गावातील सरफुद्दीन नावाचा एक मुलगा केरळमधील एका हॉटेलमध्ये मजूर म्हणून काम करत होता.याच काळात तो हॉटेलच्या ३० वर्षीय मालकिणीच्या प्रेमात पडला.
हॉटेलच्या मालकिणीला पहिल्यापासूनच मजुराचं काम आवडत होतं, त्यामुळे ती त्याच्या प्रेमात पडली. सरफुद्दीन मालकिणीच्या सर्व गोष्टी ऐकत असे आणि तिने सांगितलेलं काम करत असे. हे जेव्हा महिलेच्या नवऱ्याला कळलं तेव्हा त्यांच्या घरात खूप वाद झाले. वादानंतर महिलेच्या पतीने त्याच्या पत्नीला तीन मुलांसह घराबाहेर हाकलून लावले.
सरफुद्दीन मालकीण सजनाला त्याच्या घराचा पत्ता दिला आणि तिला झारखंडमधील कोडरमा येथे राहण्यास सांगितलं. महिला कोडरमा येथे आली आणि चार दिवस तिच्या सरफुद्दीनची वाट पाहत राहिली. पण त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर ती महिला सरफुद्दीनच्या बैरिया येथील घरी पोहोचली. ती घरी पोहोचताच तिला पाहण्यासाठी आजूबाजूचे लोक जमले.
महिलेची भाषा इथल्या लोकांना समजत नाही. ज्यामुळे संवाद साधण्यात अडचण येत आहे. मी माझ्या आईच्या घरी सुरक्षित आहे. सरफराजुद्दीन येईपर्यंत मी त्याच घरी राहीन असं महिलेने म्हटलं आहे. सरफुद्दीन त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्कात नसल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.