शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"भारत माता विकली"; संसदेत राहुल गांधी संतापले, अमेरिकेसोबतच्या ट्रेड डीलवर बोलताना म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 14:25 IST

"ज्या डेटाच्या जोरावर भारत २१ व्या शतकात महासत्ता बनू शकला असता, तोच डेटा सरकारने परकीयांच्या हाती सोपवला आहे," असा घणाघाती आरोप करत राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना निरुत्तर केले.

दीर्घकाळ चाललेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी सभागृहात केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला. अमेरिकेसोबत झालेल्या व्यापारी करारावरून राहुल गांधींनी मोदी सरकारला धारेवर धरले. "मोदी सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली येऊन देशाचा डेटा आणि स्वाभिमान गहाण ठेवला आहे," असा खळबळजनक आरोप करत राहुल गांधींनी संसदेत वादळ निर्माण केले. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही खडे बोल सुनावले.

"ज्या डेटाच्या जोरावर भारत २१ व्या शतकात महासत्ता बनू शकला असता, तोच डेटा मोदी सरकारने परकीयांच्या हाती सोपवला आहे," असा घणाघाती आरोप करत राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना निरुत्तर केले.

भारतीय डेटा हीच २१ व्या शतकातील शक्ती!

राहुल गांधींनी आपल्या भाषणात डिजिटल अर्थव्यवस्थेवर भर दिला. ते म्हणाले, "अमेरिका आणि चीनमधील स्पर्धेत आज सर्वात मौल्यवान काय असेल, तर तो भारतीयांचा डेटा आहे. अमेरिकेला जर त्यांचे डॉलरचे वर्चस्व टिकवून ठेवायचे असेल, तर त्यांना भारतीय डेटाची गरज आहे. मात्र, मोदी सरकारने या ट्रेड डीलमध्ये आपल्या डेटावरील नियंत्रण सोडून दिले आहे. अमेरिकेमध्ये फ्री डेटा फ्लो आणि डिजिटल टॅक्सवर मर्यादा आणून सरकारने देशाचे नुकसान केले आहे."

आम्ही ट्रम्प यांचे नोकर नाही! - राहुल गांधी

राहुल गांधींनी आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांना थेट संदेश दिला. "जर इंडिया आघाडीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चर्चा केली असती, तर आम्ही स्पष्ट केले असते की, आम्ही तुमचे मित्र आहोत, पण नोकर नाही. आम्ही त्यांच्याशी बरोबरीच्या नात्याने बोललो असतो. ट्रम्प यांना जर भारतीय डेटाचा ॲक्सेस हवा असेल, तर त्यांनी आमच्याशी सन्मानाने वागले पाहिजे," असे राहुल गांधी ठणकावून म्हणाले.

शेतकरी आणि ऊर्जा सुरक्षेवरून सरकारवर ओढले ताशेरे

राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करताना तीन महत्त्वाचे मुद्दे मांडले. ते म्हणाले की, आपली ऊर्जा सुरक्षा ही सर्वोपरि आहे आणि ती आम्ही कोणत्याही परिस्थितीत वाचवू. ट्रम्प यांना त्यांच्या शेतकऱ्यांचे हित पाहायचे आहे, पण आम्हाला आमच्या शेतकऱ्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे वाटते. अमेरिकेने भारताला पाकिस्तानच्या बरोबरीने लेखू नये. जर, ट्रम्प पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसोबत नाश्ता करत असतील, तर भारताने त्यावर आपली भूमिका स्पष्ट मांडायला हवी.

काय आहे राहुल गांधींचे सरकारवरील ५ मोठे आरोप?

१. डिजिटल ट्रेड रूल्सवरील नियंत्रण भारताने सोडून दिले आहे. २. 'डेटा लोकलायझेशन'ची अट शिथिल करण्यात आली. ३. अमेरिकेला विनामूल्य डेटा फ्लोची परवानगी दिली. ४. डिजिटल टॅक्सवर मर्यादा आणल्या. ५. मोठ्या कंपन्यांना २० वर्षांची टॅक्स हॉलिडे देऊन देशाचे नुकसान केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi Accuses Government of Selling India Over Trade Deal.

Web Summary : Rahul Gandhi slammed the government in Parliament, alleging a trade deal compromised India's data sovereignty under US pressure. He accused the government of handing over valuable Indian data to foreign entities, jeopardizing the nation's digital future and farmers' interests.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसदGovernmentसरकारCentral Governmentकेंद्र सरकारAmericaअमेरिकाUSअमेरिका