शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

छेडछाड करणाऱ्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी आई-मुलीने मारली धावत्या ट्रेनमधून उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 13:35 IST

कानपूरमध्ये छेडछाड करणाऱ्या तरुणांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी आई-मुलीने धावत्या ट्रेनमधून उडी मारल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देकानपूरमध्ये छेडछाड करणाऱ्या तरुणांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी आई-मुलीने धावत्या ट्रेनमधून उडी मारल्याची घटना घडली आहे. या मायलेकी  रेल्वे रुळांजवळ तब्बल दोन तास बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या.

कानपूर- कानपूरमध्ये छेडछाड करणाऱ्या तरुणांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी आई-मुलीने धावत्या ट्रेनमधून उडी मारल्याची घटना घडली आहे. यामध्ये त्या दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत. या मायलेकी  रेल्वे रुळांजवळ तब्बल दोन तास बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या.

आई आणि मुलगी हावडा-जोधपूर एक्स्प्रेसमधून कोलकाताहून दिल्लीला येत होत्या. एक्स्प्रेसने हावडा स्थानक सोडल्यानंतर १५ तरुणांनी त्यांची छेड काढण्यास सुरुवात केली. पीडितेच्या आईने याबाबत रेल्वे पोलीस शिपायाला माहिती दिली. त्यानंतर शिपाई डब्यात आला आणि छेड काढणाऱ्या दोन ते तीन तरुणांना घेऊन गेला. काही वेळाने ते तरुण पुन्हा डब्यात घुसले. त्यांनी दोघींचीही छेड काढण्यास सुरुवात केली. त्यांनी मुलीला खेचण्याचा प्रयत्न केला. यामुळे भेदरलेल्या मायलेकींनी अब्रु वाचवण्यासाठी धावत्या एक्स्प्रेसमधून उडी मारली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. दोन तास त्या रेल्वे रुळांजवळ बेशुद्धावस्थेत पडून होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेचा तपास करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.

मायलेकीने धावत्या ट्रेनमधून उडी मारल्याचं पाहिल्यानंतर गार्डने या घटनेची माहिती जीआरपीच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर जीआरपीने घडनास्थळी पोहचत त्या दोघींना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. दरम्यान, या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जातो आहे. पोलिसांनी जर वेळेवर छेडछाड करणाऱ्या तरूणांच्या विरोधात कारवाई केली असती तर ही घटना घडली नसल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाMolestationविनयभंग