शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

"आतापर्यंतचं सर्वात अवैज्ञानिक सरकार..."; कोरोना परिस्थितीवरून ओवैसी यांचा मोदी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2021 12:44 PM

Coronavirus Pandamic : कोरोनामुळे उद्धभवलेल्या ऑक्सिजनच्या परिस्थितीवरून सर्वोच्च न्यायालयानं केली होती टास्क फोर्सची स्थापना

ठळक मुद्देकोरोनामुळे उद्धभवलेल्या ऑक्सिजनच्या परिस्थितीवरून सर्वोच्च न्यायालयानं केली होती टास्क फोर्सची स्थापनाओवेसींनी केली कोरोनाच्या परिस्थितीतवरुन केंद्र सरकारवर टीका

सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत देशातील आरोग्य व्यवस्थेवरही ताण येत आहे. दरम्यान, सध्या देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीदेखील कोरोनाच्या परिस्थितीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकार आतापर्यंतचं अवैज्ञानिक सरकार असल्याचं म्हणत ओवेसी यांनी सरकारवर टीका केली. पहिल्या लाटेनंतर सरकारनं स्वत:च्या विजयाची घोषणा केली आणि स्वत:च स्वत:ला शाबासकीही दिल्याचं ते म्हणाले. "त्यांचे स्वत: सल्लागारच तिसऱ्या लाटेबद्दल गोंधळलेल्या स्थितीत आहेत. सरकारच्या आदेशावर वैद्यानिक आपली स्थिती बदलत आहेत का?," असा सवालही त्यांनी यावेळी केला. ओवेसी यांची ही प्रतिक्रिया केंद्र सरकारचे मुख्य सल्लागार विजय राघवन यांच्या त्या वक्तव्यानंतर आली ज्यात त्यांनी तिसऱ्या लाटेबद्दल शक्यता व्यक्त केली होती. ओवेसी यांनी ट्विटरद्वारे सर्वोच्च न्यायालयाद्वारे नेमलेल्या राष्ट्रीय टास्क फोर्सच्या स्थापनेवरूही निशाणा साधला. "जर सरकार दुसऱ्या लाटेसाठी तयार असतं आणि त्यांचा वागणूक निष्काळजीपणाची नसती तर याची गरज पडली नसती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावरून सरकार घटनात्मक संस्थांचे स्वातंत्र्य कसे खंडित करण्याचा प्रयत्न करीत आहे हे दिसून येते. कार्यकारी क्षेत्रात न्यायालयाचा हा एक प्रकारचा हस्तक्षेप आहे," असंही ओवेसी म्हणाले. सर्वोच्च न्यायालयानं शनिवारी एका नॅशनल टास्क फोर्सची स्थापना केली. देशातील ऑक्सिजनची उपलब्धता आणि पुरवठ्याची माहिती, तसंच यासंदर्भातील शिफारसी करण्याचं काम हे टास्क फोर्स करणार आहे. टास्क फोर्समध्ये १२ सदस्य असतील. टास्क फोर्स आता आणि भविष्यातील पारदर्शक पद्धतीनं महासाथ आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी मदत आणि रणनिती सादर करणार असल्याचं न्यायालयानं म्हटलं.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदी