शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

यूपीए सरकारच्याच काळात सर्वाधिक प्रगती- पी. चिदंबरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:09 IST

स्वातंत्र्यानंतर देशाची सर्वात जास्त प्रगती काँग्रेसप्रणित केंद्रातील यूपीए-१, यूपीए-२ या सरकारांच्या दशकभराच्या कालावधीत झाली आहे, असा दावा माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला.

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर देशाची सर्वात जास्त प्रगती काँग्रेसप्रणित केंद्रातील यूपीए-१, यूपीए-२ या सरकारांच्या दशकभराच्या कालावधीत झाली आहे, असा दावा माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला. सध्या देशात वास्तवातील, कायद्याने नेमलेला व एक अदृश्य असे तीन अर्थमंत्री देशाची अर्थव्यवस्था हाताळत असतात, असा टोलाही त्यांनी लगावला.यूपीए-१च्या काळात देशाचा सरासरी विकासदर ८.८७ टक्के होता. २००७-०८या कालावधीत तो दोन अंकी म्हणजे १०.०८ टक्के झाला होता. यूपीए-२च्या काळात देशाचा सरासरी विकासदर ७.३९ टक्के होता. यूपीए १ व २ सरकारांच्या काळात देशातील १४ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यात यश आले असेही चिदंबरम म्हणाले. केंद्राच्या सांख्यिकी विभागाने देशातील राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नाबाबत जी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे त्याचा आधार त्यांनी आपल्या वक्तव्यासाठी घेतला. हा अहवाल केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी खात्याने शुक्रवारी वेबसाइटवर झळकवला होता.भाजपाचा टोलाभाजप प्रवक्ते समबित पात्रा यांनी म्हटले की, ही आकडेवारी अधिकृत नसून तिचा सरकारने अद्याप स्वीकार केलेला नाही. ज्यावेळेला काँग्रेसला यश मिळत नाही ते अपयश साजरे करताना दिसतात. यूपीए सरकारच्या काळात महागाई वाढली होती. आर्थिक तूट कमी करण्यात त्यांना अपयश आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत जगातील पहिल्या सहा मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश झाला.

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGovernmentसरकार