नवी दिल्ली : महाराष्ट्रात केवळ तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा दोनच दिवसांपूर्वी कृषिमंत्री राधामोहनसिंग यांनी लोकसभेत केला असताना सरकारने शुक्रवारी या राज्यात जानेवारी ते मार्च २०१५ या काळात तब्बल २५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती देत आकडेवारीचा घोळात घोळ संपला नसल्याचे व कालावधीबाबत संभ्रम कायम असल्याचेच दाखवून दिले. दरम्यान, मराठवाड्यात तीन महिन्यात सर्वाधिक ११४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, अशी माहिती सरकारने दिली. अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसलेल्या महाराष्ट्रात उपरोक्त तीन महिन्यांच्या कालावधीत २५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती राज्याकडून मिळाल्याचे कृषी राज्यमंत्री मोहनभाई कुंदारिया यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले.
मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या
By admin | Updated: April 25, 2015 01:38 IST