BREAKING: मॉस्कोहून गोव्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, गुजरातमध्ये इमर्जेंन्सी लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 23:25 IST2023-01-09T23:24:09+5:302023-01-09T23:25:24+5:30
मॉक्सोहून गोव्याला जाणाऱ्या विमानाच जामनगर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे.

BREAKING: मॉस्कोहून गोव्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, गुजरातमध्ये इमर्जेंन्सी लँडिंग
अहमदाबाद-
मॉस्कोहून गोव्याला जाणाऱ्या विमानाच जामनगर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. विमानात बॉम्ब ठेवल्याच्या माहितीनं खळबळ उडाली आणि या धमकीनंतर विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एटीसीला विमानात बॉम्ब ठेवल्याचा मेल आला होता. या मेलनंतर हायअलर्ट जारी करण्यात आला आणि विमानाच्या पायलटला सूचित करण्यात आलं. गोव्याला जाणारं विमान तातडीनं गुजरातच्या जामनगर विमानतळावर उतरवण्यात आलं.
भुवनेश्वरला जाणाऱ्या प्रवासी विमानामध्ये बिघाड; दिल्ली एअरपोर्टवर इमर्जेंसी घोषीत
जामनगर विमानतळावर सध्या पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक दाखल झालं आहे. विमानाची तपासणी केली जात आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. विमानात २०० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. आता बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल नेमका कुठून आला? कुणी केला याची चौकशी केली जात आहे.
विमानात बॉम्ब ठेवल्याची सूचना मिळाली होती त्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. सर्व प्रवासी विमानतळावर सुरक्षितरित्या उतरले आहेत. जवळपास रात्री १० वाजताच्या सुमारास विमानाचं लँडिंग झालं आहे.