शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा बरसला, आता सप्टेंबरमध्येही देशभरात धो धो, भारतीय हवामान खात्याचा अंदाज, १०९ टक्के बरसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 11:13 IST

Weather Update: सप्टेंबर महिन्यात देशामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. वायव्य भारत व आजूबाजूच्या प्रदेशात अतिवृष्टी होईल, असा अंदाजही भारतीय हवामान खात्याने शनिवारी वर्तविला आहे.

नवी दिल्ली - सप्टेंबर महिन्यात देशामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. वायव्य भारत व आजूबाजूच्या प्रदेशात अतिवृष्टी होईल, असा अंदाजही भारतीयहवामान खात्याने शनिवारी वर्तविला आहे.

वायव्य भारतातील काही भाग वगळता दक्षिणेतील अनेक प्रदेश, बिहारचा उत्तर भाग, उत्तर प्रदेशचा ईशान्येकडील प्रदेश व ईशान्य भारतातील बहुतांश प्रदेशात सप्टेंबर महिन्यात सामान्य पातळीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे. मात्र, भारताच्या बहुतांश भागात या महिन्यात सामान्य पातळीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.

भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी राजधानी नवी दिल्लीत शनिवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, देशात १६७.९ मिमी या दीर्घकालीन सरासरीच्या १०९ टक्के पाऊस सप्टेंबरमध्ये पडण्याचा अंदाज आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान आणि मध्य प्रदेशलगतच्या भागांसह देशाच्या वायव्य प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

ऑगस्टमध्ये १६ टक्के अधिक पाऊस

■ भारतामध्ये ऑगस्ट महिन्यात सामान्य पातळीपेक्षा १६ टक्के अधिक पाऊस पडला आहे. वायव्य भारतात २५३.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे, २००१ नंतर ऑगस्टमध्ये महिन्यात पडलेला हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले.

या खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, देशात ऑगस्टमध्ये सरासरी २४८.१ मिमी पावसाच्या तुलनेत २८७.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

केरळ, विदर्भासह अनेक भागांत कमी पाऊस

■ भारतात १ जूनपासून मान्सूनला प्रारंभ झाल्यापासून हिमालयाच्या पायथ्याशी असलेला प्रदेश व ईशान्येकडील अनेक जिल्ह्यांमध्ये सामान्य पातळीपेक्षा कमी पाऊस पडल्याचे दिसून आले.

■ कमी दाबाच्या पट्टयातील स्थितीमध्ये काही बदल झाल्यामुळे असा पाऊस पडला आहे. केरळ आणि महाराष्ट्रातील विदर्भ या प्रदेशासह ईशान्येकडील अनेक राज्यांमध्ये कमी पाऊस पडला, असे भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

टॅग्स :weatherहवामानIndiaभारत