शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आंब्याच्या बागेत २४ हून अधिक माकडांचा मृत्यू; विषबाधा झाल्याचा संशय; ७ आरोपी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 18:37 IST

उत्तराखंडमधील उधम सिंह नगर येथे एक एकराच्या आंब्याच्या बागेत जवळपास २४ माकडांचे मृतदेह आढळले.

उत्तराखंडमधील उधम सिंह नगर येथे एक एकराच्या आंब्याच्या बागेत जवळपास २४ हून अधिक माकडांचे मृतदेह आढळले. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी बागेत धाव घेतली. बागेची देखभाल करणाऱ्यांनीच माकडांना विष देऊन मारले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून ५-७ लोकांना ताब्यात घेतले आहे.

उधम सिंह नगरातील काशीपूर येथे झालेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. आंब्याची बाग असलेली जमीन शेजारील राज्य उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीची आहे. त्याने दोन वर्षापूर्वी ही जमीन भाड्याने दिली होती. जेव्हा स्थानिक लोक त्यांच्या जनावरांसाठी चारा नेण्यासाठी बागेत पोहोचले तेव्हा त्यांना एक माकड आपल्या मृत आईला मिठी मारून रडताना दिसले. 

खड्ड्यात आढळली मृत माकडेआपल्या आईचा मृतदेह पाहून रडत असलेल्या माकडाला पाहून स्थानिकांनी त्याला सुरक्षितस्थळी नेले. यादरम्यान, ग्रामस्थांना आंब्याच्या बागेत अनेक ठिकाणाहून दुर्गंधी येत होती. त्यांनी दुर्गंधी येत असलेल्या भागात खोदले असता त्यांना अनेक माकडे खड्ड्यात गाडलेली आढळून आली. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील १५ वर्षापासून ही बाग भाड्याने दिली जात आहे. त्यांनी या बागेची देखभाल करणाऱ्या लोकांवर माकडांना विष देऊन मारण्याचा आरोप केला आहे. 

दोषींवर कठोर कारवाई केली जाईल - पोलीसघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अधिक माहिती घेतली. यानंतर पोलिसांनी बागेची देखभाल करणाऱ्या सर्व ५-७ जणांना ताब्यात घेतले. तर, मृत माकडांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तसेच याप्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडMonkeyमाकडDeathमृत्यूPoliceपोलिस