शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

चारशेहून अधिक भारतीय मायदेशी; मायभूमीवर पाय ठेवताच केला जयघोष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 6:05 AM

अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या भारतीयांची चिंता वाढली होती. तालिबानने भारतीयांवर हल्ला करणार नसल्याचे जाहीर केले असले तरीही भीती  होती.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अफगाणिस्तानातील  तणावग्रस्त परिस्थितीत वायुसेनेच्या विशेष विमानांमधून सुमारे ४०० भारतीयांना मायदेशी परत आणण्यात यश आले आहे. भारतीयांसह काही अफगाण नागरिकांना घेऊन वायुसेनेची विमाने गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसवर उतरली. भूमीवर पाय ठेवताच भाारतीयांनी ‘भारतमाता की जय’ अशा घोषणाही दिल्या. 

अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या भारतीयांची चिंता वाढली होती. तालिबानने भारतीयांवर हल्ला करणार नसल्याचे जाहीर केले असले तरीही भीती  होती. सुमारे २०० शीख आणि हिंदू नागरिक एका गुरुद्वारामध्ये थांबले होते. अखेर वायुसेनेच्या विशेष विमानांमधून त्यांना भारतात आणण्यात आले. तीन विमानांमधून ३२९ भारतीय आणि अफगाणिस्तानच्या दोन खासदारांसह जवळपास ४०० जणांना भारतात आणण्यात आले.. याशिवाय अमेरिका आणि नाटोच्या विमानांमधून दोहा येथे गेलेल्या १३५ भारतीयांनाही परत आणण्यात आल्याची माहिती वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दोहा येथून भारतात आलेल्या नागरिकांमध्ये बहुतांश जण हे विविध परदेशी कंपन्यांचे कर्मचारी आहेत. कतार, ताजिकिस्तान, अमेरिका व इतर मित्र राष्ट्रांच्या मदतीने भारत ही मोहीम राबवीत आहे.

अफगाण महिलेने मानले आभारभारतात दाखल झालेल्या अफगाण नागरिकांनी भारताचे आभार मानले आहेत. एका महिलेने सांगितले की, तालिबान्यांनी माझे घर जाळले. त्यामुळे मी, माझी मुलगी आणि दोन नातवंडे येथे आलो आहोत. या कठीण प्रसंगात आमचे भारतीय बंधू आणि भगिनी आमच्या मदतीला आले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.

अडकलेल्या प्रत्येक भारतीयाला सुरक्षितपणे भारतात परत आणण्यास सर्वोच्च प्राधान्य असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या नागरिकांची नेमकी ठिकाणे शोधण्याचे आव्हान आहे. त्यामुळे भारतीयांनी तसेच त्यांना नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांनी माहिती पुरविण्याचे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. nभारतीयांसोबत अनेक अफगाण नागरिकही भारतात दाखल होत आहेत. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानindian air forceभारतीय हवाई दल