मुख्यमंत्र्यांच्या वजनाहून अधिक रक्तदान
By Admin | Updated: December 19, 2014 22:57 IST2014-12-19T22:57:00+5:302014-12-19T22:57:00+5:30
रक्तदान शिबिर : ३८७ कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

मुख्यमंत्र्यांच्या वजनाहून अधिक रक्तदान
र ्तदान शिबिर : ३८७ कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान फोटो ओळी... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना, उपस्थितात प्रवीण दटके, श्याम वर्धने व दयाशंकर तिवारी. नागपूर : राष्ट्रीय नागपूर कापार्ेरेशन एम्प्लाईज असोसिएशनतर्फे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज इमारतीच्या आवारात आयोजित रक्तदान शिबिरात शुक ्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाहून अधिक रक्त गोळा करण्यात आले. मुख्यमंत्री हे या संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या वजनाइतके रक्त गोळा करण्याचा संकल्प विविध कर्मचारी संघटनांनी केला होता. यात ३८७ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. गोळा के लेले रक्त अर्पण रक्तपेढीला सुपूर्द करण्यात आले. फडणवीस यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. महापौर प्रवीण दटके अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, आयुक्त श्याम वर्धने, माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी, नगरसेवक सुनील अग्रवाल आदी उपस्थित होते. महापौरपदाच्या कार्यकाळात तसेच आमदार म्हणून फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या मार्गी लावल्या. तिवारी यांच्या संकल्पनेनुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संचालन मनपा कर्मचारी बॅकेेचे अध्यक्ष राधेश्याम निमजे यांनी तर आभार असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजेश हाथीबेड यांनी मानले. यावेळी हेमंत पवार, शीतल घरत, प्रगती पाटील, असलम खान, सभापती रमेश पुणेकर, गोपाल बोहरे, गिरीश देशमुख, संदीप जाधव, किशोर डोरले आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)