शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

टीव्ही, फ्रीजसह ८८हून अधिक वस्तू स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 3:40 AM

जीएसटी कौन्सिलचा दिलासा; सॅनिटरी पॅड पूर्णपणे करमुक्त

नवी दिल्ली : सॅनिटरी नॅपकिनला जीएसटीतून सूट देण्याच्या एक वर्षापासून सुरू असलेल्या मागणीला जीएसटी परिषदेच्या बैठकीत शनिवारी मंजुरी देण्यात आली. त्यासोबतच ८८ वस्तूंवरील कराचे दर कमी करण्यात आले आहेत. यात टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, विजेवर चालणारे घरगुती उपकरणे आणि अन्य उत्पादनांचा समावेश आहे.यापुढे वर्षाला ५ कोटी रुपयांपेक्षा कमी व्यवसाय करणारे छोटे व्यावसायिक तिमाही रिटर्न दाखल करू शकतात. तिमाही रिटर्नही मासिक रिटर्नसारखाच भरावा लागणार आहे. परिषदेने रिव्हर्स चार्ज व्यवस्थेवरील अंमलबजावणी ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत स्थगित केली आहे. परिषदेने सेवा क्षेत्रातील सुविधेसाठी काही निर्णय घेतले आहेत. हॉटेलच्या रूमवरचा जीएसटी आता घोषित भाड्याऐवजी वास्तविक घेतल्या जाणाऱ्या भाड्यावर लागेल. सध्या ७५०० रुपयांपेक्षा अधिकच्या रूमवर २८ टक्के व २५०० ते ७५०० रुपयांच्या रूमवर १८ टक्के तर, १००० ते २५०० रुपयांच्या रूमवर १२ टक्के कर आकारण्यात येतो.या वस्तूंना वगळलेसॅनिटरी नॅपकीन व्यतिरिक्त राखी, हस्तकला, स्टोन, मार्बल, लाकडी मूर्ती, फूलझाडू, सालपत्ते आदी वस्तूंवर यापुढे कोणताहीकर लागणार नाही. हस्तकलेद्वारे निर्मित छोट्या वस्तूही करातून पूर्णपणे वगळण्यात आल्या आहेत.२८% ऐवजी १८% करटीव्ही (२७ इंचांपर्यंत), वॉशिंग मशीन, फ्रिज, व्हिडिओ गेम्स, लिथियम आयर्न बॅटरी, व्हॅक्युम क्लीनर्स, फूड ग्राइंडर्स, मिक्सर, स्टोरेज वॉटर हिटर, ड्रायर, रंग, वॉटर कूलर्स, मिल्क कूलर्स, आइस्कीम कूलर, परफ्यूम, टॉयलेट स्प्रे आदी वस्तूंवर आजवर २८ टक्के इतका जीएसटी लावला जात होता. तो आता १८ टक्क्यांवर आणण्यात आला आहे.१८% ऐवजी १२% करहॅण्डबॅग, दागिन्यांचे बॉक्स, पेटिंगचे लाकडी बॉक्स, आर्टवेअर ग्लास, हातांनी बनवलेले लॅम्प आदी वस्तूंवरील कर घटवून १२ टक्के केला आहे. बांबूच्या वस्तूंवरही १२ टक्के इतकाच कर आकारला जाईल.५% कर : जीएसटी कौन्सिलने इथेनॉलवर असलेल्या १८ टक्के करात मोठी कपात करत आता तो ५ टक्क्यांवर आणला आहे. याचा चीनी उद्योग आणि शेतकरी वर्गाला मोठा फायदा होणार आहे. या व्यतिरिक्त, १००० रुपयांपर्यंतची पादत्राणे आणि बुटांवरही ५ टक्के इतका कर आकारला जाईल.

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनGSTजीएसटी