More than 500 terrorists are preparing to Intrusion jammu-kashmir | पाकव्याप्त काश्मीरमधून 500हून अधिक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

पाकव्याप्त काश्मीरमधून 500हून अधिक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

नवी दिल्लीः पाकव्याप्त काश्मीरमधून 500 दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या उच्चाधिकाऱ्यांनी दिली आहे. PoKमधल्या नियंत्रण रेषेजवळ विविध प्रशिक्षण शिबिरांमध्ये 500 दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीची संधी शोधत आहेत. तसेच 200 ते 300 दहशतवादी पाकिस्तानच्या मदतीनं या क्षेत्राला अशांत ठेवण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्येच सक्रिय आहेत.

लष्कराचे उत्तरी बाजू सांभाळणारे प्रमुख लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये 200-300 दहशतवादी सक्रिय असून, परिसरातील शांतता भंग करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सिंह यांना जम्मू-काश्मीरमधील सक्रिय दहशतवाद्यांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिलं आहे. 
PoKमधल्या दहशतवाद्यांच्या शिबिरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

त्यांची संख्या किती असली तरी आम्ही त्यांना रोखण्यास सक्षम आहोत. या क्षेत्रात शांतता आणि सामान्य परिस्थिती आम्ही टिकवून ठेवू, असंही सिंह यांनी सांगितलं आहे. परंतु पाकिस्तान इकडची शांतता भंग करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पाकिस्तानमधूनच दहशतवादाला खतपाणी घातलं जात आहे. भारतात घुसखोरी करण्यासाठी त्यांनी लाँचिंग पॅडही तयार केले आहे.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: More than 500 terrorists are preparing to Intrusion jammu-kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.