शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

...अन् हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं! लग्नाच्याच दिवशी घराला भीषण आग; 5 जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 08:52 IST

लग्नाची तयारी सुरू असलेल्या तीन मजली इमारतीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद जिल्ह्यात लग्नाची तयारी सुरू असलेल्या तीन मजली इमारतीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आग इतक्या वेगाने पसरली की इमारतीतील पहिल्या मजल्यावरील लोकांना इमारती बाहेर येण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे होरपळून पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये तीन लहान मुलांचा देखील समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या सात नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे. याच घरामध्ये आज लग्न होणार होतं. विवाहसोहळ्यात सहभागी होण्यासाठी शमा परवीन या मुरादाबादमध्ये आपल्या माहेरी आल्या होत्या. पहिल्या मजल्यावर त्या आपली आई आणि मुलांसह राहत होत्या. पण या आगीत त्यांचा मृत्यू झाला आणि हसतं खेळतं घर उद्धवस्त झालं आहे. ज्या घरात सनईचे सूर ऐकू येणार होते, तिथेच दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

मुरादाबादच्या गलशहीद परिसरात राहणाऱ्या जावेद कुरेशी यांच्या दोन मुलीचं 26 ऑगस्ट रोजी लग्न होतं. घरामध्ये आनंदाचं वातावरण असून लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. याच दरम्यान ही दुर्घटना घडली. मुरादाबादचे न्यायदंडाधिकारी शैलेंद्र कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरादाबादमधील तीन मजली इमारतीत आग लागल्याने पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर सात लोक जखमी झाले आहेत. एकाच कुटुंबातील सदस्य या इमारतीत राहत होते. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशfireआग