शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

विक्रमाचा चंद्रस्पर्श अधुरा; लॅँडरशी तुटला संपर्क; चांद्रयानाची प्रदक्षिणा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2019 2:02 AM

पंतप्रधानांनी केले कौतुक । देश शास्त्रज्ञांच्या पाठीशी; इस्रोप्रमुखांच्या डोळ्यांत आले अश्रू

निनाद देशमुख बंगळुरू : इस्रोच्या शास्त्रज्ञांसह समस्त भारतीयांनी पाहिलेले चंद्रावर यान उतरविण्याचे स्वप्न शेवटच्या क्षणी भंगले. मात्र, चांद्रयानाची चंद्राभोवती प्रदक्षिणा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: बंगळुरूच्या इस्रोच्या नियंक्षण कक्षात येऊन शास्त्रज्ञांना धीर देत संपूर्ण देश तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला.

चांद्रयान मोहिमेत प्रत्यक्ष चंद्र्रावर उतरणाऱ्या विक्रम या लहान यानाचा संपर्क तुटला असला तरी इस्त्रोमधील शास्त्रज्ञांनी अद्याप आशा सोडलेली नाही. या मोहिमेतील मुख्य चांद्र्रयानाने चंद्राभोवती भ्रमण व्यवस्थित सुरू आहे. त्यावरील यंत्रणाही उत्तम काम करीत आहेत. त्या यंत्रणाच्याद्वारे विक्रमशी संपर्क साधण्याची धडपड इस्रोमधील शास्त्रज्ञ करीत आहे.

प्रज्ञान या रोव्हरला घेऊन जाणारे विक्रम हे छोटे यान कोसळले की नीट उतरू शकले नाही याबद्दल अद्याप काहीच सांगता येत नाही. यानाच्या अवतरणाचे फुटेज उपलब्ध नसते. चंद्रावर उतरणाºया यानाचे चित्रीकरण करणारा उपग्रह नाही. कोणत्याच देशाकडे तो नाही. यामुळे यानाकडून येणाºया संदेशावरूनच यानाच्या स्थितीविषयी निष्कर्ष काढावा लागतो. आजच्या स्थितीत विक्रमबद्दल तीनच गोष्टी संभवतात. १) यान कोसळले व नष्ट झाले. २) यान उतरले पण नादुरुस्त झाले. ३) यान ठीक असले तरी केवळ संपर्क यंत्रणा नादुरुस्त  झाली. विक्रमबाबत नेमके काय झाले असावे याची खातरजमा करण्याच्या कामाला आता इस्रोची टीम लागली आहे.यातील तिसरी शक्यता ही केवळ आशा आहे. विक्रम उतरताना अगदी शेवटच्या दोन मिनिटांमध्ये जे आकडे इस्रोच्या स्क्रीनवर दिसत होते ते पाहता यान सुरक्षित असण्याची शक्यता फारच कमी आहे, असे जाणकारांचे मत आहे. काही हजार प्रतितास या वेगाने येणारे यान सहा ते सात किलोमीटर प्रतितास इतक्या कमी वेगमर्यादेवर आणायचे होते. मात्र चंद्रापासून काही किलोमीटर अंतरावर असताना यानाचा वेग अचानक वाढलेला दिसून येतो. याचा अर्थ यानाचा वेग नियंत्रित करणारी रॉकेट पुरेशा कार्यक्षमतेने प्रज्वलीत झाली नसावीत. परिणामी यान वेगाने चंद्र्राकडे खेचले गेले असावे.

यानाचा वेग नियंत्रित करून ते हळूवारपणे उतरविण्याचे तंत्र फारच गुंतागुंतीचे असते. मानवरहित यानात ते अधिकच कठीण होते. हे कौशल्य हाती आले आहे का हेच इस्रो तपासून पाहणार होती. पण आज तरी त्यामध्ये यश आलेले नाही.मात्र चंद्राच्या पृष्ठभूमीपर्यंतचा प्रवास व्यवस्थित झाला व शेवटच्या टप्प्यातील हालचालीही योग्य पध्दतीने झाल्यामुळे इस्रोचा आत्मविश्वास वाढला आहे. विक्रमला घेऊन जाणारे मूळ चांद्रयान सुस्थितीत असून पुढील वर्षभर चंद्र्राभोवती घिरट्या घालणार आहे. तेथून चंद्र्राचे बरेच वेध घेतले जाणार आहेत. याच यानाचा उपयोग करून विक्रमचा काही पत्ता लागतो का वा विक्रमशी संपर्क होतो का याची चाचपणी इस्त्रो करणार आहे. विक्रमचे आयुष्य केवळ १४ दिवसांचे असल्याने इस्त्रोला लवकर काम करावे लागणार आहे. विक्रम या लहान यानाकडून आलेल्या शेवटच्या संंदेशापर्यंत मिळालेल्या माहितीचे बारकाईने विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. विक्रमबाबत नेमके काय झाले याचा निष्कर्ष त्यानंतरच काढण्यात येईल.

विक्रमचा संपर्क तुटल्यानंतर इस्त्रोच्या नियंत्रण कक्षात नैराश्याचे वातावरण पसरले. इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांच्यासह अनेक शास्त्रज्ञ हताश झाले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना विश्वास दिला. ‘तुम्ही चांगला प्रयत्न केला. संपूर्ण देशाला तुमच्यावर अभिमान आहे’, असे म्हणत पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शनिवारी सकाळी पंतप्रधानांनी पुन्हा इस्त्रोच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन शास्त्रज्ञांना प्रोत्साहित करणारे भाषण केले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.

शुक्रवारी मध्यरात्री इस्त्रोच्या केंद्रात प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. विक्रम लॅँडर चंद्रावर उतरण्याची वेळ जवळ येऊ लागल्यावर उत्साह वाढत गेला. बंगलोर येथील टेलीमेटी कमांड सेंटर आणि डीप स्पेस सेंटर येथील मुख्य नियंत्रण कक्षात शास्त्रज्ञ विक्रम लँडरच्या प्रगतीकडे लक्ष ठेवून होते. गुरुवारी यानाची तपासणी केली गेली. ते सुस्थितीती असल्याचे जाहीर करण्यात आले.मध्यरात्री, १ वाजून ५३ मिनिटांनी विक्रम लँडर चंद्रावर उतरणे अपेक्षित होते. नियंत्रण कक्षात १ वाजून ३८ मिनिटांनी लँडर चंद्रावर उतरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अपेक्षेनुसार यानाचा प्रवास सुरू असल्याने इस्रोया शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावर आनंद होता. १.वा. ३८ मिनिटांनी विक्रम लँडर चंद्राच्या भूमीपासून ३० कि.मी. अंतरावर होते. यानाचा वेग ताशी ६ हजार २२१ कि.मी. इतका कमी करण्यात यश आले होते. हा वेग आणखी कमी करण्यासाठी १ वा. ३८ मिनिटांनी यानातील रफ ब्रेकिंग यंत्रणा सुरू झाली. यानाचा वेग कमी करण्यासाठी बसविलेल्या रॉकेट प्रज्वलित करणारी ही यंत्रणा असते. या काळात विक्रम लँडरवरील संगणक प्रणाली आज्ञावली देत होती. रफ ब्रेकिंग यंत्रणा सुरू झाल्यानंतर यानातील ४ रॉकेट प्रज्वलीत झाली. त्यामुळे वेग कमी झाला. याचा संदेश विक्रम लँडरकडून नियंत्रण कक्षाकडे येताच सर्वांनी जल्लोष केला. मात्र लँडींगला अजूनही काही मिनिटे बाकी होती. १ वा. ४८ मिनिटांनी विक्रम लँडर चंद्र्रापासून ७ कि.मी. अंतरावर होते. यावेळी यानाचे इंजिन पुन्हा प्रज्वलीत करण्यात आले. यामुळे यानाचा वेग बराच कमी झाला. हा संदेश मिळताच पुन्हा सर्वांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. यानाचे सर्व कार्य योग्यरित्या होत होते.

चंद्र्राच्या पृष्ठभागापासून ७.४ कि.मी. अंतरावर असताना लँडींगचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. ही प्रक्रिया सुरळित सुरू झाल्याचा संदेश यानाने दिला. ही पण चांगली बातमी होती. काही वेळात यान चंद्रावर उतरेल अशी खात्री वाटत होती. विक्रमने १ वा. ५० मि. नेव्हिगेशन प्रणाली सुरू करणे अपेक्षित होते. या प्रणालीमुळे विक्रमचे अवतरण ठीक झाले असते. मुख्य नियंत्रण कक्षात लावलेल्या स्क्रिनवर यान योग्य रित्या यान पुढे जात असल्याचे दिसत होते. यानाचा वेग कमी करीत तो शून्यावर आणण्यात येणार होता. १. ५५ मि. यान चंद्राच्या ५ कि.मी. अंतरावर होते. शास्त्रज्ञांनी पुन्हा टाळ्या वाजवित आनंद व्यक्त केला. मुख्य कक्षात असलेले पंतप्रधान मोदीही टाळ्या वाजवून शास्त्रज्ञांचे कौतुक करीत होते.

सर्वांना चांद्र्रयानाच्या लँडींगची प्रक्रिया योग्य रीतीने पुढे जात असल्याचे वाटले. मात्र त्याआधी काही क्षण यानाने मुख्य मार्ग काही क्षण सोडल्याची नोंद झाली. यामुळे शास्त्रज्ञांचा तणाव वाढला. मात्र क्षणार्धात यान पुन्हा मुख्य मार्गावर आल्याने आशा वाढली. तरी काहीतरी गडबड होत असल्याचे ज्येष्ठ शास्त्रज्ञाना जाणवले होते. यान चंद्रापासून केवळ २.१२ कि.मी. अंतरावर असताना यानाकडून येणारे संदेश अचानक बंद झाले. याचवेळी यानाने मुख्य मार्ग सोडल्याचेही स्क्रीनवर दिसू लागले. नियंत्रण कक्षाच्या बाहेर मात्र यास यान चंद्रावर उतरले अशा प्रकारे जल्लोष सुरू झाला. मात्र नियंत्रण कक्षातील प्रमुखांनाही विक्रम लँडरकडून मिळणारे संदेश बंद झाल्याचे सांगताच सर्वांचे चेहरे पडले. इस्रोचे प्रमुख के. शिवम नियंत्रण कक्षातील शास्त्रज्ञांकडून माहिती घेत होते. जल्लोष एकदम शांत झाला. यानाशी संपकार्चा सुरू करण्याची धडपड सुरू होती. मात्र संपर्क होऊ शकला नाही. अवतरणाची नियोजित वेळ निघून गेल्याने काय झाले असेल याचा अंदाज सर्वांना आला. शिवम यांनी पंतप्रधानांना सर्व माहिती दिली. भारतातील इस्रोच्या अन्य केंद्रातूनही विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र तो झाला नाही. त्यामुळे चांद्रयान सुखरूप उतरण्याचे स्वप्न भंगले.

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2