शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मोदी सरकारच्या अर्थनितीवर किती टक्के लोकं समाधानी? जाणून घ्या, देशाचा मूड ​​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 10:00 PM

Mood Of The Nation Survey: वाढती महागाई आणि बेरोजगारीचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरलेला असताना देशातील जनतेनं मात्र मोदी सरकारच्या अर्थनितीवर समाधान व्यक्त केलं आहे.

Mood Of The Nation Survey: वाढती महागाई आणि बेरोजगारीचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरलेला असताना देशातील जनतेनं मात्र मोदी सरकारच्या अर्थनितीवर समाधान व्यक्त केलं आहे. तथापि, मोदी सरकराच्या आर्थिक नितींवर पसंती देणाऱ्या लोकांच्या संख्येत गेल्या वर्षभरात घट झाली आहे. देशातील सध्या ५२ टक्के जनता मोदी सरकारच्या आर्थिक नितीवर संतुष्ट आङे. इंडिया टुडे आणि सी वोटरच्या ताज्या सर्व्हेमधून ही माहिती समोर आली आहे. 

देशाचा मूड जाणून घेण्यात आलेल्या सर्व्हेत वर्षभरापूर्वी ६० टक्क्यांहून अधिक जनतेनं मोदी सरकारच्या आर्थिक नितीवर पसंती दर्शवली होती. पण यात घट झाली असून हे प्रमाण ५२ टक्क्यांवर आळं आहे. ताज्या सर्व्हेनुसार १९ टक्के जनता आर्थिक बाजूनं मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक असल्याचं म्हणत आहेत. तर २६ टक्के लोक सरकारच्या कामगिरीवर खूश आहेत. 

बड्या उद्योपतींना मोठा फायदापंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला विरोधकांनी नेहमीच बड्या उद्योगपतींचं सरकार अशी उपमा दिली आहे. सर्वेक्षणात जेव्हा याबाबत विचारण्यात आलं तेव्हा ४८ टक्के लोकांनी मोदी सरकारमुळे बड्या उद्योगपतींना फायदा होत असल्याचं म्हटलं आहे. तर १२ टक्के लोकांनी शेतकऱ्यांना फायदा झाल्याचं म्हटलं आहे. तसंच मोदी सरकारच्या नितीमुळे नोकरदार वर्गाचा ८ टक्के फायदा झाल्याचं म्हटलं आहे. तसंच ८ टक्के लोकांच्या मते मोदी सरकारमुळे छोट्या व्यावसायिकांचा फायदा झाला आहे. 

क्रिप्टोकरन्सीवर बंदी हवीक्रिप्टोकरन्सीवर बंदीच्या बाबतीत विचारण्यात आलं असता ३० टक्के लोकांनी क्रिप्टोकरन्सीवर बंदी असावी याबाजूनं कौल दिला आहे. तर २८ टक्के लोकांनी क्रिप्टोकरन्सीच्या बाजूनं आपलं मत व्यक्त केलं आहे. 

कोरोनाबाबत आर्थिक उपायांवर जनता खूशकोरोनाच्या प्रादुर्भावामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. सरकारनं अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी आत्मनिर्भर भारत पॅकेज लॉन्च केलं. यावर जनता खूश असल्याचं दिसून आलं आहे. ६० टक्के लोकांनी कोरोना काळात मोदी सरकारनं केलेल्या आर्थिक उपयांवर समाधान व्यक्त केलं आहे. तर ३१ टक्के लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यात ९ टक्के लोकांनी याबाबत काहीच मत व्यक्त करता येणार नाही असं म्हटलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा